पोदार स्कूलला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:43 AM2017-08-03T02:43:13+5:302017-08-03T02:43:13+5:30

खराळवाडीच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने ताथवडेच्या इंदिरा नॅशनल स्कूलचा पराभव करीत सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.

Poddar School wins title | पोदार स्कूलला विजेतेपद

पोदार स्कूलला विजेतेपद

Next

पिंपरी : खराळवाडीच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलने ताथवडेच्या इंदिरा नॅशनल स्कूलचा पराभव करीत सुब्रतो मुखर्जी चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद आयोजित स्पर्धेचा मासूळकर कॉलनीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुलात सांगता झाली. अंतिम सामन्यात पोदार स्कूलने इंदिरा स्कूलवर टायब्रेकरमध्ये ३-१ ने सरशी साधत विजेतेपदावर नाव कोरले. निर्धारीत वेळेत सामन्यात गोलशून्य बरोबरी झाली. त्यामुळे टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. त्यात पोदारकडून मैत्रेय बिराजदार, आदिती गायकवाड आणि आस्था मोरे यांनी गोल केले. इंदिरा स्कूलकडून एकमेव गोल मोनिशा पंधू हिने नोंदविला. दिघीच्या आर्मी पब्लिक स्कूलने तिसरा क्रमांक मिळविला. त्यांना शाहूनगरच्या अभिषेक विद्यालय संघाने पुढे चाल दिली.
त्यापूर्वी पहिल्या उपांत्य सामन्यात पोदार स्कूूलने आर्मी पब्लिक स्कूलवर २-० ने सहज
विजय मिळविला. त्यांच्या सायली जाधव आणि श्रुती लोंढे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसºया उपांत्य लढतीत इंदिरा स्कूलने अभिषेक विद्यालयावर टायब्रेकरमध्ये ४-३ ने मात केली. गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये इंदिराच्या रिया कुलकर्णी, गायत्री गणगे, कुरणा गेहाणी, वरदा कलाल यांनी तर अभिषेककडून तेजल जाधव, रितू आवटे, अनुजा आदट यांनी गोल केले.
त्यापूर्वींच्या साखळी सामन्यात इंदिरा स्कूलने स्पाईन रोड, चिखलीच्या बिकॉन हायस्कूलवर टायब्रेकरमध्ये १-० ने सरशी साधली. वरदा कन्नलने गोल केला. अभिषेक विद्यालयाने पिंपरीच्या टाटा मोटर्स विद्यानिकेतनचा सडनडेथमध्ये १-० असा पराभव केला. गोलशून्य बरोबरीनंतर टायब्रेकरमध्ये २-२ बरोबरी झाली होती. टायब्रेकरमध्ये अभिषेककडून तेजल जाधव, संजना तोषीखानी यांनी आणि विद्यानिकेतनकडून दीक्षा कांबळे, निधी खोब्रागडे यांनी गोल केले. सडनडेथमध्ये अभिषेकला साक्षी डोंगरेने विजय मिळवून दिला.

Web Title: Poddar School wins title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.