पिंपरीत शाळा व महाविद्यालयांबाहेरील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 06:21 PM2018-08-30T18:21:05+5:302018-08-30T18:28:38+5:30

अलिकडच्या काळात शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंकडून मुलींच्या छेडछाडीचे विविध प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून ही मोहीम उघडण्यात आली आहे. 

Police action against schools and colleges outside road romieo in Pimpri | पिंपरीत शाळा व महाविद्यालयांबाहेरील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई 

पिंपरीत शाळा व महाविद्यालयांबाहेरील टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई 

Next
ठळक मुद्देताब्यात घेतलेल्यांसह इतर बेशिस्त ३३ वाहनांची यादी कारवाईसाठी पिंपरी वाहतूक नियमन विभागाकडेटवाळखोरांकडून त्रास होत असेल तर पोलिसांकडे तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन

पुणे:  पिंपरी शहर व परिसरात शाळामहाविद्यालयाबाहेर विनाकारण थांबत टवाळखोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये ३५ मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या ताब्यात घेतलेल्या सर्व टवाळखोरांना त्यांच्या नातेवाईंकांसमोर समज देत सोडून दिले. अलिकडच्या काळात शाळामहाविद्यालयाच्या परिसरात रोडरोमिओंकडून मुलींच्या छेडछाडीचे विविध प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून ही मोहीम उघडण्यात आली आहे. 
  पिंपरी परिसरातील ताब्यात घेतलेल्यांसह इतर बेशिस्त ३३ वाहनांची यादी पिंपरी वाहतूक नियमन विभागाकडे कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. प्रतिभा कॉलेज, जय हिंद कॉलेज, संत तुकाराम नगर या भागात ही कारवाई करण्यात आली. तसेच या कारवाईनंतर शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधत कुणा टवाळखोरांकडून त्रास होत असेल तर पोलिसांकडे तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले. शहरात मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी ही कारवाईची मोहीम यापुढे अधिक कडक पध्दतीने राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले. 
 ही कार्यवाही पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे , पोलीस उफ आयुक्त स्मार्थना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे, पोलीस उपनिरीक्षक सागर पाटील यांच्या पथकाने केली.   

Web Title: Police action against schools and colleges outside road romieo in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.