Pimpri Chinchwad: अकरा वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या तरुणाच्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 20:54 IST2023-12-12T20:53:06+5:302023-12-12T20:54:06+5:30
सोमवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली....

Pimpri Chinchwad: अकरा वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी आवळल्या तरुणाच्या मुसक्या
पिंपरी : अकरा वर्षीय मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी तरुणाला अटक केली. मोशी येथे सोमवारी (दि. ११) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी अक्षय ऊर्फ टकल्या सुधाकर गायकवाड (२६, रा. मोशी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षीय मुलगी किराणा साहित्य घेऊन घरी येत होती. यावेळी संशयित गायकवाड याने तिच्याशी गैरवर्तन केले. याआधीदेखील त्याने पीडितेशी गैरवर्तन केले होते. फिर्यादी महिलेच्या नणंद त्याला जाब विचारण्यासाठी गेल्या असता त्यांनादेखील संशयिताने शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.