पोलीस उपायुक्त ‘कोंडी’त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 12:54 AM2018-09-01T00:54:15+5:302018-09-01T00:54:55+5:30
आढावा बैठकीवेळी घडला प्रकार : हिंजवडीत स्वत: केले वाहतूक नियमन
वाकड : हिंजवडी आयटी नगरीतील रस्ते आणि मुख्य चौकांची पाहणी करून वाहतूककोंडीबाबत आढावा घेत असताना पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व वाकड विभागाचे सहायक आयुक्त श्रीधर जाधव वाहतूककोंडीत अडकले होते. ही कोंडी सोडविण्यासाठी उपायुक्त पाटील आणि सहायक आयुक्त जाधव यांनी स्वत: दीड तास वाहतूक नियमन केले. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला.
आयटीनगरी हिंजवडीची वाहतूक समस्या जटिल आहे. चार दिवस झालेल्या संततधार पावसाने वाहनांचा खोळंबा झाला. परिणामी वाहतूककोंडीच्या समस्येत भर पडली. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील व वाकड विभागाचे सहायक आयुक्त श्रीधर जाधव शुक्रवारी सायंकाळी हिंजवडीत रस्ते आणि मुख्य चौकांची पाहणी करण्यासाठी आले होते. या वेळी वाहतूक समस्यांचा आढावाही त्यांच्याकडून घेण्यात येणार होता. मात्र सायंकाळी गर्दीची वेळ असल्याने पाटील आणि जाधव वाहतूककोंडीत अडकले. त्यामुळे त्यांनी स्वत: दीड तास वाहतूक नियमन केले.
हिंजवडी आयटीनगरी वाहतूक समस्येच्या गर्तेत आहे. येथील रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीत भर घालणाऱ्या समस्यांबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होेते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. त्यानंतर येथील पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभनदेखील वाहतूककोंडीत अडकले होते. या सर्वांची दाखल घेत उपायुक्त पाटील यांनी हिंजवडीतील प्रमुख चौकांची पाहणी करून तेथील समस्यांचा आढावा घेतला. सकाळी व सायंकाळी सिग्नलच्या वेळा बदलणे, सेवा रस्त्यावरील वाहतूक एकेरी करणे, सायंकाळच्या वेळी वाहनांना नो एंट्री करणे आदी उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक नियंत्रण कक्ष
१नवीन पोलीस आयुक्तालयांतर्गत हिंजवडीसाठी वाकड येथे वाहतूक नियंत्रक कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे येथील वाहतूककोंडीतून काही प्रमाणात सुटका मिळणार असल्याची आशा सर्वांना आहे. या कक्षासाठीही या वेळी पाहणी करण्यात आली. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक विभागाचे प्रमुख किशोर म्हसवडे यांच्यासह वाहतूक पोलीस व हिंजवडी पोलीस कर्मचारी वाहतूक नियमन करीत होते.
अधिकाºयांचा दे धक्का
२पोलीस उपायुक्त नम्रता पाटील भूमकर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. त्या वेळी एक टँकर अचानक भूमकर चौकातील भुयारी मार्गात बंद पडला. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. टँकर त्वरित बाजूला घेणे आवश्यक होते. त्यामुळे वाहतूक नियमन करणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनीच या टँकरला धक्का देत तो ढकलला. हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, वाहतूक विभागाचे प्रमुख किशोर म्हसवडे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी धक्का देऊन टँकर बाजूला काढला.