नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 06:53 PM2021-03-09T18:53:00+5:302021-03-09T18:54:56+5:30

दोन जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश

Police custody to two person in Nagar Urban Co-op Bank fraud case | नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

googlenewsNext

पिंपरी : नगर अर्बन को-ऑप बॅंकेच्या २२ कोटींच्या फसवणूक प्रकरणी सोमवारी (दि. ८) अटक करण्यात आलेल्या दोघांना मंगळवारी (दि. ९) मोरवाडी, पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना सोमवार(दि. १५ ) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच याच प्रकरणात यापूर्वी पोलीस कोठडीत असलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.  
   
आशुतोष सतीश लांडगे (वय ३८, रा. अहमदनगर), जयदीप प्रकाश वानखेडे (वय ३४, रा. पुणे, मूळ रा. श्रीरामपूर ), असे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापूर्वी नवनीत शांतीलाल सूरपुरिया (वय ५५, रा. अहमदनगर) आणि यज्ञेश बबन चव्हाण (वय २५, रा. संभाजीनगर, चिंचवड) या दोघांना अटक केली होती. सूरपुरिया आणि चव्हाण या दोन्ही आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. ९) पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांनाही मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर अर्बन बॅंक फसवणूक प्रकरणी महादेव पंढरीनाथ साळवे (वय ५६, रा. अहमदनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली आहे. बॅंकेच्या चिंचवड येथील शाखेत २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Police custody to two person in Nagar Urban Co-op Bank fraud case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.