आरोपींच्या मेडिकलसाठी वणवण, डॉक्टर मिळणे पोलिसांना झाले दुरापास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:04 AM2018-01-31T03:04:34+5:302018-01-31T03:04:37+5:30
येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाºया गुन्ह्यांमधील आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून, कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची पोलीसच तक्रार करू लागले आहेत.
कामशेत : येथील पोलीस ठाणे हद्दीत घडणाºया गुन्ह्यांमधील आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी कामशेत पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागत असून, कामशेत शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर मिळणे दुरापास्त झाले असल्याची पोलीसच तक्रार करू लागले आहेत.
कामशेत शहरात शासनाचे पुरस्कार विजेते प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही या आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टर नाहीत. शिवाय जे डॉक्टर कार्यरत आहेत ते दुपारी अकरानंतरच गायब होत असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तर गैरसोय होतेच आहे. शिवाय एखाद्या गुन्ह्यातील आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वा इतर कारणांसाठी कामशेत पोलिसांची मोठी दमछाक होत आहे.
यात कान्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोपीला वैद्यकीय तपासणी करण्यास नेल्यास तेथील वैद्यकीय अधिकारी कामशेतमध्येच करा असेच सूचवतात. या सर्व प्रकारामुळे बहुतेक नेहमीच तळेगाव येथील सरकारी रुग्णालयात आरोपींची तपासणी करण्याची वेळ कामशेत पोलिसांवर येत आहे. त्यामुळेच आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरकारी रुग्णालय असूनही त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे. कामशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी डॉक्टरांची नेमणूक करावी शिवाय कार्यरत डॉक्टर हे पूर्ण वेळ उपस्थित असावेत, अशी मागणी नागरिकांसह आता पोलिसांकडूनही होत आहे. या विषयी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांना संपर्क साधला असता ते रुग्णालयात उपस्थित नव्हते.
फोन करून केली जाते विनंती
सोमवारी दुपारी कामशेत पोलिसांना एका
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची वैद्यकीय तपासणी
करायची होती. मात्र नेहमी प्रमाणे कामशेतमधील
सरकारी डॉक्टर उपस्थित नसल्याने वीस ते पंचवीस किलोमीटर लांब असलेल्या तळेगाव येथील सरकारी डॉक्टरांना वैयक्तिक फोन करून विनंती करून ही तपासणी करून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले.