पोलीस काकांनी सात वर्षाच्या बालकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 04:18 PM2017-09-27T16:18:08+5:302017-09-27T16:18:08+5:30

मागील आठवड्यात पुणे शहर पोलिसांनी पोलीस काका उपक्रम हाती घेतला. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पोलीस काका उपक्रमाची माहिती देण्यात आली.

Police have released a seven-year-old kidnappers from the hand of the kidnappers | पोलीस काकांनी सात वर्षाच्या बालकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका

पोलीस काकांनी सात वर्षाच्या बालकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून केली सुटका

googlenewsNext

पिंपरी -  मागील आठवड्यात पुणे शहर पोलिसांनी पोलीस काका उपक्रम हाती घेतला. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पोलीस काका उपक्रमाची माहिती देण्यात आली. त्यातील एका पोलीस काकाने ओम खरात या सात वर्षाच्या बालकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी अतुलनीय कामगिरी केली. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे हे त्या पोलीस काकांचे नाव आहे.

निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत काम करणा-या पोलीस निरिक्षक शंकर आवताडे यांची पोलीस खात्यातील कामगिरी कौतुकास्पद आहे. पूर्णानगर येथून अपहरण झालेल्या ओमच्या सुटकेसाठी पुणे शहर पोलिसांची मोठी फौज कार्यरत होती. एकट्या अवताडे यांनी त्याची सुटका केली असे म्हणता येणार नाही, परंतू त्यांनी पुर्वानुभवाच्या जोरावर परिस्थिती अत्यंत उत्तमपणे हाताळली. त्यांची भूमिका महत्वाची होती. अपहरकर्त्यांना थेट सामोरे जाण्यासाठी वरिष्ठांनी त्यांची निवड केली होती.

अपहरणकर्त्यांनी मागणी केलेल्या खंडणीची रककम सुपूर्त करणे, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणे ही चर्चा करत असताना, स्वत: पोलीस आहोत हे कोठेही जाणवू न दणे हे कौशल्य आवताडे यांच्याकडे आहे. त्यांनी अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी त्यांचे हे कौशल्य उपयोगात आणले आहे. गुन्हे शाखेत विविध गुन्हेगारी घटनांचा तपास करताना आलेल्या अनुभवाच्या जोरावर आवताडे यांनी ओमच्या सुटकेचे मिशन यशस्वीपणे पूर्ण केले.

अपहरणकर्ते ओमच्या वडिलांशी संपर्क साधून साठ लाखाच्या खंडणीची मागणी करीत होते. मोबाइल लोकेशन ट्रेस करीत पोलिसांनी अपहरणकर्ते कोठे आहेत, याचा अंदाज घेतला. ओमचे वडील संदीप खरात यांनी अपहरणकर्त्यांशी संपर्क साधून रक्कम देणार असल्याची तयारी दर्शवली. त्यानंतर ओमला सुखरूप सोडण्यास तयार आहोत असे, अपहरणकर्त्यांनी मोबाइलवरून त्यांना कळविले. त्या वेळी ओमच्या वडिलांचे मोठे बंधू अर्थात ओमचे काका म्हणुन आवताडे अपहरणकर्त्यांना भेटण्यास निघाले. 

हालचाल, वागण्या बोलण्यात कोठेच पोलीस असल्याचे भासू नये, याची पुरेपूर दक्षता आवताडे यांनी घेतली होती. त्यांनी वेष बदलला होता. शाळेत येऊन पोलीस काका उपक्रमांची माहिती देणारे हेच ते पोलीस काका हे चाणाक्ष ओमने ओळखले. अपहरणकर्त्यांच्या मोटारीच्या बाजुने त्यांची मोटार जात असताना,ओमनेच अपहरणकर्त्यांना काका आले आहेत असे सांगितले. ज्यावेळी अपहरणकर्ते त्यांच्याजवळ गेले त्यावेळी त्याने वडिलांकडे धाव न घेता, पोलीस काकांकडे अर्थात आवताडे यांच्याकडे धाव घेऊन मिठी मारली.                        

Web Title: Police have released a seven-year-old kidnappers from the hand of the kidnappers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.