पिंपरीत पोलिस निरीक्षकाला धमकावले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी, दोघांना अटक

By नारायण बडगुजर | Published: April 8, 2024 09:05 AM2024-04-08T09:05:11+5:302024-04-08T09:05:56+5:30

पिंपरी येथील झुलेलाल चौकात कपडा मार्केट समोर शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेआठताच्या सुमारास हा प्रकार घडला...

Police inspector threatened in Pimpri; Kudos to the police who went into action, two arrested | पिंपरीत पोलिस निरीक्षकाला धमकावले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी, दोघांना अटक

पिंपरीत पोलिस निरीक्षकाला धमकावले; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना अरेरावी, दोघांना अटक

पिंपरी : रस्त्यावर पथारी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिस निरीक्षकाला धमकी दिली. पिंपरी येथील झुलेलाल चौकात कपडा मार्केट समोर शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेआठताच्या सुमारास हा प्रकार घडला. 

अब्दुल रहिमान जहाउद्दीन इद्रेसी, अनुपमा सिंग उर्फ अमृतकौर गुलजारसिंग विरदी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मोंटू आणि एका अनोळखी व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक शहाजी पवार यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. ६) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक शहाजी पवार हे वाहतूक विभागातील अंमलदारांसोबत पिंपरी कपडा मार्केट येथे कारवाई करीत होते. सार्वजनिक रस्त्यावर पथारी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पथारी चालकांवर कारवाई करत असताना संशयितांनी पोलिस निरीक्षक शहाजी पवार आणि त्यांच्या अंमलदारांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यांनी मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली. पोलीस निरीक्षक पवार यांच्या मदतीसाठी आलेल्या अंमलदारांना देखील त्यांनी अरेरावी केली. पोलिस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

Web Title: Police inspector threatened in Pimpri; Kudos to the police who went into action, two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.