‘थर्टी फर्स्ट’च्या निमित्ताने पोलीस यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 04:06 AM2017-12-31T04:06:57+5:302017-12-31T04:07:15+5:30
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, कार्यक़्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण ३७५ पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पिंपरी : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेलांमध्ये थर्टी फर्स्टच्या पार्ट्या, कार्यक़्रमांचे आयोजन केले जाते. या कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. एकूण ३७५ पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अशी माहिती परिमंडल तीनचे सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिली.
वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र भामरे म्हणाले, वाहतूक शाखेनेही थर्टी फर्स्टच्या निमित्ताने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये १६ तपासणी नाके निश्चित करण्यात आले आहेत. शहरात प्रवेश करण्याच्या आणि शहराबाहेर पडण्याच्या मार्गावर प्रमुख ठिकाणी हे तपासणी नाके आहेत. ७ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि ७२ वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सज्ज ठेवले आहेत. बॅरिकेटस लावून वाहनांची, वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे. नाकाबंदी केलेल्या ठिकाणी ब्रिथ अनॅलायझरच्या साह्याने वाहनचालक मद्याच्या अंमलाखाली आहे की नाही हे तपासले जाणार आहेत. दुचाकी, चारचाकी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे.
राज्याच्या गृहखात्याने दिलेल्या आदेशानुसार, हॉटेलचालकांना नियमित वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल सुरू ठेवण्यास तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून थर्टी फर्स्ट सेलिबे्रेशनसाठी हॉटेल व्यावसायिकांनी परवाने घेतले आहेत. पहाटे पाचपर्यंत हॉटेलमध्ये कार्यक़्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यपींसाठी एक दिवसाचा परवाना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
देशी मद्यासाठी प्रति व्यक्ती २ रुपये असे एक दिवसाचे शुल्क आकारण्यात येत आहे. विदेशी मद्य घेणाºयांसाठी प्रत्येकी पाच रुपये शुल्क घेतले जात आहे. देशी मद्यासाठी १२००० तर परदेशी मद्यासाठी २५००० असे
एकूण ३७ हजार परवाने पिंपरी चिंचवडमध्ये वितरित करण्यात आले आहेत. एफएल २, एफएलबीआर २, सीएल ३ या प्रकारातील परवाने हॉटेलचालकांनी नूतनीकरण करून घेतले आहेत, अशी माहिती
उत्पादन शुल्क पिंपरी विभागाच्या अधिकाºयांनी दिली.