आगामी निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 04:42 PM2019-02-19T16:42:10+5:302019-02-19T16:42:26+5:30
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पिंपरी : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील १२ पोलीस निरीक्षक, १३ सहायक पोलीस निरीक्षक आणि ५० पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बाबतचा आदेश सोमवारी काढण्यात आला आहे.
बदली झालेल्यांमध्ये भानुदास जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे यांची बदली पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ येथे करण्यात आली आहे. सुधाकर काटे यांची पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनीट-२ ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळेगाव दाभाडे अशी बदली केली आहे. अमरनाथ रामचंद्र वाघमोडे यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी ते पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा येथे बदली केली आहे. राजेंद्र पांडूरंग कुंटे वरिष्ठ पोलीस निरिक्षक भोसरी एमआयडीसी ते नियंत्रण कक्ष संलग्न येथे बदली करण्यात आली आहे. भीमराव एन. शिंगाडे यांची पोलीस निरीक्षक विशेष शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक निगडी अतिरिक्त कार्यभार अशी बदली केली आहे. विवेक व्ही. मुगळीकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली ते पोलीस निरीक्षक सायबर सेल अशी बदली केली आहे. श्रीराम बळीराम पौळ यांची पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिखली अतिरिक्त पदभार अशी बदली करण्यात आली आहे. शंकर वामनराव अवताडे यांची पोलीस निरीक्षक गुन्हे चिखली ते पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड येथे बदली केली आहे. सतिश पवार यांची पोलीस निरीक्षक वाहतुक विभाग देहूरोड ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी अशी बदली करण्यात आली आहे. आर.पी. चौधर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी ते पोलीस नियंत्रण कक्ष संलग्न अशी बदली झाली आहे. उमेश औदुंबर तावसकर पोलीस निरीक्षक वाहतुक शाखा ते वाहतुक नियंत्रण कक्ष अशी बदली झाली आहे. सतिश विठ्ठलराव नांदुरकर यांची पोलीस निरीक्षक (गुन्हे )भोसरी एमआयडीसी ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार असा त्याच पोलीस ठाण्यात त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला आहे. बदली झालेल्यांमध्ये एकुण १३ सहायक पोलीस निरीक्षक ,५० पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे बदल करण्यात आले आहेत. निवडणुकीपुर्वी असे बदल नेहमीच केले जातात. त्यानुसार यावेळीही पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.