रावेत येथे स्पा सेंटरमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 13:52 IST2021-03-10T13:50:53+5:302021-03-10T13:52:21+5:30
रावेत येथील हर्पल यूनीसेक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

रावेत येथे स्पा सेंटरमधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका
पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रावेत येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी छापा टाकून पाच महिलांची सुटका करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.
स्पा सेंटरचा चालक व मालक अमोल दत्तात्रय नवले (वय २९, रा. चाकण), तसेच स्पा सेंटरचा मॅनेजर आकाश अनिल सोनवणे (वय २४, रा. थेरगाव, मूळ रा. औंढी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे यांनी या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेत येथील हर्पल यूनीसेक्स स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकून कारवाई करण्यात आली. पाच महिलांची सुटका करून आरोपींना अटक केली.