पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण ; तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 07:49 PM2019-03-24T19:49:31+5:302019-03-24T19:50:01+5:30
पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करीत दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथील डायनासोर गार्डनच्यासमोर शनिवारी मध्यरात्री घडली.
मनोहर कडु सोनवणे (वय ४६) असे मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी खैरे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) याच्यासह आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास डायनासोर गार्डनच्यासमोर आरोपी हातात दगड घेवून आरडाओरडा करीत होता. त्यावेळी सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी सोनवणे यांना आरोपीने शिवीगाळ करीत हाताने मारहाण करुन बघून घेण्याची व नोकरी घालविण्याची धमकी दिली. तसेच आरोपीच्या इतर दोन साथिदारांनी सोनवणे व त्यांच्या सहकारयांना दगड फेकून मारले. दरम्यान, मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.