पिंपरीतील प्रिन्सदादा साथीदारांसह पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: May 13, 2017 01:28 PM2017-05-13T13:28:36+5:302017-05-13T14:55:35+5:30

डांगेचौक हिंजवडी येथे तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या चार आरोपींच्या 24 तासांच्या आत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Police in the possession of Prince of Pimpri, along with his associates | पिंपरीतील प्रिन्सदादा साथीदारांसह पोलिसांच्या ताब्यात

पिंपरीतील प्रिन्सदादा साथीदारांसह पोलिसांच्या ताब्यात

Next

 ऑनलाइन लोकमत

पिंपरी-चिंचवड, दि. 13 - डांगेचौक हिंजवडी रस्त्याजवळील मोकळ्या जागेत तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या चार आरोपींच्या 24 तासांच्या आत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. चारही आरोपींना औरंगाबाद येथून अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.  शुक्रवारी मध्यरात्री या चार जणांना वाकड पोलीस ठाण्यात आणण्यात आले. प्रेम प्रकरणातून श्रीनिवासचा काटा काढण्यात आल्याचे तपासणीदरम्यान स्पष्ट झाले आहे.   
 
श्रीनिवास पडवळे (वय 22, जि. कोल्हापूर) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी सागर उबाळे (वय 19) याच्यासह आंबादास गायकवाड, सोमनाथ कुंभार व प्रफुल पंडित या चार जणांना अटक करण्यात आली आहे.  
 
श्रीनिवासच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपीच्या नात्यातील मुलीसोबत श्रीनिवासचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. व ही बाब आरोपी सागर उबाळेला मान्य नसल्याने त्याने साथीदारांच्या मदतीनं  श्रीनिवासचा काटा काढण्याचे ठरवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  
 
त्यानुसार गुरुवारी रात्री श्रीनिवासला थेरगाव येथे गाठून मित्रांच्या मदतीने मोकळ्या मैदानात आणण्यात आले. श्रीनिवासवर प्रथम हत्याराने गळ्यावर वार केले. त्यानंतर ओळख पटू नये म्हणून डोके आणि तोंड दगडाने निर्घृणरित्या ठेचण्यात आले. यांनतर सागर उबाळे व आंबादास गायकवाड हे दोघे औरंगाबादला मामाकडे पळून गेले होते. 
 
दरम्यान, घटनास्थळावर सापडलेल्या मृतदेहाच्या हातावर श्रीनिवास हे नाव गोंदले होते. यामुळे पोलिसांनी त्वरित मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले. त्यानुसार वाकड ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीधर जाधव यांनी हिंजवडी सांगवी, चतु: शृंगी पोलिसांची मदत घेत प्लॅन आखून तीन पथके आरोपीच्या मागावर रवाना केली. शुक्रवारी रात्री वाकड पोलिसांनी सोमनाथ आणि प्रफुल या दोघांना ताब्यात घेतले होते तर अन्य दोघांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने औरंगाबादमधून ताब्यात घेतले.

Web Title: Police in the possession of Prince of Pimpri, along with his associates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.