Police Recruitment 2021: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:39 PM2021-10-05T15:39:58+5:302021-10-05T15:48:04+5:30

गेली अनेक दिवसांपासून परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती

police recruitment 2021 examination for 720 posts pimpri chinchwad | Police Recruitment 2021: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी परीक्षा

Police Recruitment 2021: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी परीक्षा

googlenewsNext

पिंपरी: राज्य शासनाकडून पोलीस भरती (police bharti 2021 केली जात आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत ७२० पदांसाठी शनिवार, दि. २३ ऑक्टोबरला ऑफलाईन लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी यांनी दिली. परीक्षा प्रलंबित राहिल्याने अर्जदार उमेदवारांना प्रतीक्षा होती. याबाबत ‘लोकमत’ने सोमवारी (दि. ४) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली.  (Maharashtra Police Recruitment 2021)  

पुणे ग्रामीण व शहर पोलीस दलाचे विभाजन करून १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यातील ७२० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यासाठी एक लाख ८९ हजार ७३२ जणांचे अर्ज आले. मात्र गेल्या वर्षी कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया रखडली. मात्र आता लेखी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली. परीक्षा केंद्र निश्चित करून आवश्यक यंत्रणा तसेच मोठा बंदोबस्त देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षार्थ्याला हॉलतिकिट, परीक्षा केंद्र, याबाबत अचूक माहिती देण्यात येणार आहे. 

लेखी परीक्षेची तारीख, वेळ
शनिवार, दि. २३ ऑक्टोबर, वेळ दुपारी : ३ वाजता  

आयुक्तालयात भरण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई पदाच्या जागा
सर्वसाधारण - १७६
महिला - २१६
खेळाडू - ३८
प्रकल्पग्रस्त - ३८
भूकंपग्रस्त - १४
माजी सैनिक - १०७
अंशकालीन पदवीधर - ७१
पोलीस पाल्य - २२
गृहरक्षक दल - ३८

लेखी परीक्षेसाठी १७ ऑक्टोबर ही तारीख जाहीर केली होती. मात्र इतर घटकांकडून त्याच दिवशी परीक्षा होणार असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. त्यासाठी परीक्षा पुढे ढकलून २३ ऑक्टोबरला घेण्याचे निश्चित केले आहे. त्याचे नियोजन करण्यात येत आहे.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Web Title: police recruitment 2021 examination for 720 posts pimpri chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.