माणमधील बोडकेवाडी येथे शेतात गांजा लावणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 17:33 IST2021-02-12T17:26:44+5:302021-02-12T17:33:51+5:30
आरोपीने सुरेश बोडके यांच्या मालकीच्या आणि त्याच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीत गांजा लावल्याचे पोलिसांना आढळले.

माणमधील बोडकेवाडी येथे शेतात गांजा लावणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पिंपरी : शेतात गांजा लावणाऱ्यास अमली पदार्थ विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. शेखर गोपाळ गुंजाळ (वय ५५, रा. इशदान सोसायटी, पौड रस्ता) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीने माणमधील बोडके वाडी येथील शेतात गांजा लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अमली विरोधी पथकाने कारवाई केली.
आरोपीने सुरेश बोडके यांच्या मालकीच्या आणि त्याच्या ताब्यात असलेल्या शेतजमिनीत गांजा लावल्याचे पोलिसांना आढळले. गांजाचे झाड ६ फूट ३ इंच उंचीचे होते. अंदाजे ७० हजार २५० रुपये किंमतीचा २ किलो दहा ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई अजित लिंबराज कुटे (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------