राजकीय गुन्हेगारीचा बिमोड आणि तडीपार गुंडाचा बंदोबस्त करा: श्रीरंग बारणे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 03:39 PM2018-10-05T15:39:37+5:302018-10-05T15:49:31+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढाऱ्यांसोबत वावर असतो.

police will be take a strictly action against crime : Shrirang Barane | राजकीय गुन्हेगारीचा बिमोड आणि तडीपार गुंडाचा बंदोबस्त करा: श्रीरंग बारणे 

राजकीय गुन्हेगारीचा बिमोड आणि तडीपार गुंडाचा बंदोबस्त करा: श्रीरंग बारणे 

Next
ठळक मुद्दे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची घेतली भेट तडीपार केलेले गुन्हेगारांचे राजरोसपणे शहरात वास्तव्य पिंपरी पोलीस ठाण्यासमोरच अवैध धंदे जोमात सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी वाढण्यास राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. पोलीस ठाणे, चौक्यांमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा राजकीय पुढाऱ्यांसोबत वावर असतो. या गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असून, यामुळेच शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासाठी पोलिसांनी अगोदर राजकीय गुन्हेगारीचा बिमोड करावा, राजकीय हस्तक्षेपाला आळा घालावा, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. 
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांची भेट घेतली. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका अ‍ॅड. ऊर्मिला काळभोर, अनंत कोºहाळे, भरत साळुंखे, सजेर्राव मारमोरे, उमेश रजपूत, रामदास केंदळे शिष्टमंडळात होते.
खासदार बारणे म्हणाले, राजकीय हस्तक्षेप वाढत असल्यानेच शहरातील सामूहिक गुन्हेगारी वाढली आहे. राजाश्रय मिळत असल्याने गुंडांची दहशत वाढली आहे. यामुळे औद्योगिक पट्ट्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे हा राजाश्रय मोडीत काढणे गरजेचे आहे. राजाश्रय मोडीत काढल्याशिवाय शहरातील गुन्हेगारी कमी होणार नाही. तडीपार केलेले गुन्हेगार राजरोसपणे शहरात वास्तव्य करतात. वाकड, थेरगाव परिसरात सर्रासपणे तडीपारांचा वावर आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. अवैध धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडितेला पोलिसांकडून योग्य वागणूक दिली जात नाही. औद्योगिकनगरीची ओळख पुसली जाऊ लागली असून बलात्कार, गुन्हेगारांची नगरी अशी ओळख होऊ लागली आहे.
 आमदार चाबुकस्वार म्हणाले, पिंपरी पोलीस ठाण्यासमोरच अवैध धंदे जोमात सुरू आहेत. दारू, मटक्यांचे अड्डे चालतात. पोलिसांना अवैध धंद्यांची संपूर्ण माहिती असूनही त्यांच्याकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. 
पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन म्हणाले, गुन्हेगारी रोखण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कामचुकार अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, गुणवत्तेवर अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात आहेत. गुणवत्ताधारक पोलिसांचा हेतू चांगला राहील. तडीपार गुंडाची माहिती काढण्यात येत आहे. त्यांच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. मनुष्यबळाची कमतरता असून, केवळ दीड हजार कर्मचारी आहेत. यामध्ये आम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. 

Web Title: police will be take a strictly action against crime : Shrirang Barane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.