राजकीय वैर इथलं संपत नाही!

By admin | Published: February 23, 2017 02:48 AM2017-02-23T02:48:07+5:302017-02-23T02:48:07+5:30

सत्तेच्या राजकारणासाठी सख्या भावा-भावांमध्ये अनेक ठिकाणी फूट पडली आहे

Political warriors do not end here! | राजकीय वैर इथलं संपत नाही!

राजकीय वैर इथलं संपत नाही!

Next

रावेत : सत्तेच्या राजकारणासाठी सख्या भावा-भावांमध्ये अनेक ठिकाणी फूट पडली आहे. त्याचाच प्रत्यय पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत मागील दोन पंचवार्षिक निवडणुकीत पाहावयास मिळाला.
मात्र, विद्यमान नगरसेवक मोरेश्वर भोंडवे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुध्द तुकाराम भोंडवे (काँग्रेस) हे दोन सख्खे भाऊ २००७च्या महापालिका निवडणुकीपासून सातत्याने एकमेकांच्या विरोधात उभे असतात. २०१२ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेले मोरेश्वर भोंडवे यांनी या वर्षीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविली. पक्षाचे सर्वेसर्र्वा शरद पवार आणि पिंपरी-चिंचवडचा रिमोट स्वत:कडे ठेवणारे अजित पवार यांच्याबरोबर राहून पक्षाचे पाठबळ मिळविण्यात ते यशस्वी झाले.
त्यांचे बंधू माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे हे काँग्रेसचे जुने कार्यकर्ते आहेत. २००७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत तुकाराम भोंडवे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष म्हणून उभे असलेल्या सख्ख्या भावाचा म्हणजेच मोरेश्वर यांचा पराभव केला होता. २०१२ च्या निवडणुकीत मात्र हे चित्र एकदम उलटे झाले. काँग्रेसने तुकाराम भोंडवे यांना रिंगणात उतरवले. त्यांच्याविरुद्ध मोरेश्वर अपक्ष म्हणून उभे राहून विजयी झाले. (वार्ताहर)

या निवडणुकीत परत दोघे भाऊ
एकमेकांसमोर उभे राहिले. फरक एवढाच आहे सातत्याने अपक्ष म्हणून उभे राहणारे मोरेश्वर या वेळी मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावरून आपले भविष्य आजमावत आहेत. पालिकेची यंदाची निवडणूक अनेकार्थीं वेगळी ठरत आहे. पक्षातील भांडणे, बंडखोरी, निवडणुकीसाठी होणारा खर्च यावरून रंगत वाढली असतानाच अनेकजण सहकुटुंब, सहपरिवार रिंगणात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भोंडवे बंधूंमधील कोणाला मतदार राजा कोणाला स्वीकारतो, हे निकालानंतरच कळेल.

Web Title: Political warriors do not end here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.