समाजकारणासाठी राजकारण करावे - सुरेश माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 01:08 AM2019-02-05T01:08:57+5:302019-02-05T01:10:20+5:30
केवळ राजकारण नाही, तर राजकारणाचा समाजकारणासाठी हत्यार म्हणून वापर कसा करता येईल, या उद्देशाने बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे.
पिंपरी - केवळ राजकारण नाही, तर राजकारणाचा समाजकारणासाठी हत्यार म्हणून वापर कसा करता येईल, या उद्देशाने बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्ष काम करीत आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण व्हावे, या भूमिकेतून काम करत असताना, राज्यघटनेच्या विरोधात काम करणाऱ्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, असे मत सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे (बीआरएसपी) नेते डॉ. सुरेश माने यांनी व्यक्त केले.
पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानावर बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर शाखेच्या वतीने जाहीर सभा घेण्यात आली.
या कार्यक्रमप्रसंगी बीआरएसपीचे प्रदेश महासचिव सर्वजीत बनसोडे, मावळ लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष संजीवन कांबळे, मिलिंद अहिरे, सदस्या अनिता साळवे यांनीही मनोगत व्यक्त केले. संयोजनासाठी ईश्वर कांबळे, विजय ओव्हाळ, महेंद्र सरोदे, कचरू ओव्हाळ, अरविंद सावंत, तसेच अनिता सोनकांबळे, नम्रता तोरणे, राजश्री भालेराव, कुट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.
केंद्रीय अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला. या अर्थसंकल्पाचे भाषण करताना, अर्थमंत्री अर्थसंकल्पातील तरतुदींवर बोलण्यापेक्षा आरक्षणावरच अधिक बोलत होते. भाजपा सरकार हे जनतेची दिशाभूल करणारे सरकार आहे. भाजपा सरकार आरक्षणाच्या घोषणा करीत आहे. प्रत्येकाला घर मिळणार, गोरगरीब जनतेतील प्रत्येकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये अनुदान जमा करणार, दर वर्षी सुमारे दोन कोटी तरुणांना रोजगार देणार अशा घोषणा केल्या होत्या. नागरिकांना अनेक आश्वासने दिली. परंतु त्यांची पूर्तता केली नाही. नागरिकांची दिशाभूल केली. अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. हे बीआरएसपीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
- डॉ. सुरेश माने, बीआरएसपी नेते