मावळमध्ये मतदानाला शांततेत सुरवात; कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 13, 2024 08:19 AM2024-05-13T08:19:33+5:302024-05-13T08:20:09+5:30
सकाळच्या पहिल्या टप्प्यात जेष्ठ नागरीं आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आले. तसेच महिला, युवा, दिव्यांग व विशेष मतदान केंद्र सजवण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मावळ लोकसभा मतदार संघात सकाळी ७ वाजता शांततेत सुरवात झाली. सकाळी पहिल्यांदा येणाऱ्या मतदारांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सकाळच्या पहिल्या टप्प्यात जेष्ठ नागरीं आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडल्याचे दिसून आले. तसेच महिला, युवा, दिव्यांग व विशेष मतदान केंद्र सजवण्यात आले आहेत. या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह दिसून आला.
कंट्रोल रुमद्वारे लक्ष
मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे जोडली आहेत. आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम स्थापित करण्यात आला असून निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.
विधानसभा निहाय नियंत्रण कक्ष...
पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. समन्वयासाठी समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे हे देखील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित आहेत. या ठिकाणाहून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधला जात आहे.