महापालिका निवडणूकीचे आज मतदान

By Admin | Published: February 20, 2017 07:34 PM2017-02-20T19:34:21+5:302017-02-20T19:34:21+5:30

महापालिका निवडणूकीचे आज मतदान

Polling for the municipal elections today | महापालिका निवडणूकीचे आज मतदान

महापालिका निवडणूकीचे आज मतदान

googlenewsNext

 

महापालिका निवडणूकीचे आज मतदान

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार असून, शहरातील १२ निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयांतर्गत असणाºया ३२ प्रभागांत मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने मतदानाची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, मतदान यंत्र आणि साहित्याचे वाटप कर्मचाºयांना करण्यात आले आहे. मतदान केंद्र, सहायक मतदान केंद्र प्रमुख, केंद्रप्रमुख कर्मचारी मतदानकेंद्रावर दाखल झाले आहेत. मतदान खोल्यांमध्ये विविध मूलभूत सुविधा सज्ज असून, मतदानासाठी एकूण १६०८ मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांसाठी मतदान प्रक्रिया मंगळवारी होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच असणार आहे. शहर परिसरात एकूण १६०८ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मनपा शाळा व इमारतींचा समावेश असून १५९ मनपा शाळा, ३२४ खासगी इमारती, १ शासकीय व २ एमआयडीसी इमारती अशा एकूण ४८६ इमारतींचा अंतर्भाव आहे. निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ११ लाख ९२ हजार ८९ असून पुरुष मतदारांची संख्या ६ लाख ४० हजार ६९६ आहे, तर महिला मतदार संख्या ५ लाख ५१ हजार ३६२ आहे. पुरूष मतदार ५३.७४ टक्के तर महिला मतदारांची संख्या ४६.२५ टक्के आहे. इतर मतदार ३१ असून त्यांची संख्या ०.००२६ टक्के आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी एकूण ८९२५ कर्मचारी व १७८५ पोलीस कर्मचारी अशा एकूण १० हजार ७१० कर्मचाºयांच्या नेमणुका केल्या. कर्मचारीही मतदान आणि मतमोजणीच्या कामास सज्ज झाले आहेत. १६०८ मतदान केंद्रांसाठी एकूण ५०५३ बॅलेट युनिट व १७७२ कंट्रोल युनिटचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक कामकाजाची पाहणी आयुक्त दिनेश वाघमारे , निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. यशवंत माने, सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केली. 

ठळक मुद्दे 

१)महापालिकेच्या १२८ जागांसाठी : ३२प्रभाग, 

२) मतदान वेळ : सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच,

३) मतदान केंद्रे : १६०८  

४) मनपा शाळा व इमारती : १५९ मनपा शाळा, ३२४ खासगी इमारती

५) मतदारांची संख्या : ११ लाख ९२ हजार ८९

६) एकूण कर्मचारी : १० हजार ७१० कर्मचारी

७) एकूण ५०५३ बॅलेट युनिट व १७७२ कंट्रोल युनिट 

 



Web Title: Polling for the municipal elections today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.