कामावरून काढल्याने फोनवर पाठवला अश्लिल फोटो; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 02:53 PM2021-04-24T14:53:27+5:302021-04-24T14:54:05+5:30

फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला कामावरून काढून टाकले.

Pornographic photos sent to the phone after removed from work, Filed a crime | कामावरून काढल्याने फोनवर पाठवला अश्लिल फोटो; गुन्हा दाखल

कामावरून काढल्याने फोनवर पाठवला अश्लिल फोटो; गुन्हा दाखल

Next

पिंपरी : कामावरून काढून टाकल्याच्या रागातून व्हाटसअपवरून अश्लील फाेटो व अश्लील लिंक पाठवली. मनास लज्जा उत्पन्न करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १५ एप्रिल रोजी राठी पावणेनउच्या सुमारास घडला.

पीडित ३१ वर्षीय महिलेने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत सदाशिव सोनटक्के (रा. नमस्कारी, ता. तिवासा, जि. अमरावती) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या वडिलांनी आरोपीला कामावरून काढून टाकले. त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला फोन करून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला व्हाटसअपवरून अश्लील फोटो व अश्लील लिंक पाठवून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न करून फिर्यादीचा विनयभंग केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने तपास करीत आहेत.

Web Title: Pornographic photos sent to the phone after removed from work, Filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.