‘पॉस’ मशिनमुळे काळाबाजार थांबण्यास मदते ,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:57 AM2017-11-28T03:57:47+5:302017-11-28T03:57:57+5:30

सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप होत आहे. यामुळे काळाबाजार थांबण्यास मदत होत आहे. मात्र, काही मशिनमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती व्यवस्थित अपलोड न झाल्याने वितरणामध्ये अडचण निर्माण होत आहे.

 The 'POS' machine allows black market to stop, | ‘पॉस’ मशिनमुळे काळाबाजार थांबण्यास मदते ,

‘पॉस’ मशिनमुळे काळाबाजार थांबण्यास मदते ,

Next

पिंपरी : सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये ‘पॉस’ मशिनद्वारे धान्यवाटप होत आहे. यामुळे काळाबाजार थांबण्यास मदत होत आहे. मात्र, काही मशिनमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती व्यवस्थित अपलोड न झाल्याने वितरणामध्ये अडचण निर्माण होत आहे.
निगडीतील परिमंडळ कार्यालयात ‘अ’ आणि ‘ज’ हे दोन विभाग असून, त्या अंतर्गत अनुक्रमे १०४ व ९४ रास्त भाव धान्य दुकानदार आहेत. या दुकानांमधून यापूर्वी शिधापत्रिकेवरच धान्य दिले जायचे. आता ‘पॉस’ मशिनद्वारे वाटप होत आहे. प्रत्येक दुकानदाराकडून शिधापत्रिकाधारकांच्या आधार क्रमांक जोडणीसह संदर्भ रजिस्टर कार्यालयात जमा झाले आहे. त्यानुसारच कार्यालयाकडून दुकानदारांना धान्य पुरविले जात आहे. आधार क्रमांक जोडले नसलेल्या सदस्यांचे धान्य दिले जात नाही.
शिधापत्रिकाधारकांची सर्व माहिती पॉस मशिनमध्ये संकलित आहे. दुकानदाराने धान्य दिल्यानंतर लगेचच त्याची पावतीदेखील मिळत आहे. या शिधापत्रिकेतील माहितीचे देखील संगणकीकरण करण्यात आले आहे.

शिधापत्रिकाधारकाला मिळतेय स्लिप
शिधापत्रिकाधारकाची संपूर्ण माहिती, युनिट संख्या, आधार क्रमांक, धान्य वितरणाचे प्रमाण आदी माहिती यामध्ये आहे. यापूर्वी आधार नसलेले धान्य घेऊन जात होते. आता त्यास आळा बसणार आहे. जितके धान्य दिले, तेवढ्या रकमेची स्लिप बाहेर येणार आहे.

मशिनमध्ये त्रुटी
पॉस मशिनमुळे कामात सुसूत्रता आली आहे. मात्र, अनेक मशिनमध्ये अद्यापही त्रुटी आहेत. शिधापत्रिकेतील माहिती अपलोड करताना काही कुटुंबांची अपुरी माहिती संकलित झाली आहे. कुटुंबातील सदस्यांच्या नावांमध्ये तफावत आहे. या यंत्रणेत व्यवस्थित सुधारणा करायला हव्यात.

माहिती जुळली, तरच धान्य
पूर्वी रास्त भाव धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर धान्य वाटप केले जात होते. यामुळे अनेकदा भलत्याच व्यक्तीने धान्य नेण्याचे प्रकार घडत होते. मात्र, आता पॉस मशिनवरील माहिती जुळली, तरच धान्य दिले जाते.
- विजय गुप्ता, खजिनदार, आॅल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकीपर फेडरेशन

Web Title:  The 'POS' machine allows black market to stop,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे