संशयाने मृतदेहाचे दोनदा शवविच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 01:16 AM2019-01-18T01:16:20+5:302019-01-18T01:16:22+5:30
रात्री ११ वाजता मोटारीतून घरी जात असताना, शिवकांत यांचा पाठलाग करणारे इसम कोण होते, असा प्रश्न उपस्थित झाला असून, त्यांच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
पिंपरी : आयटी अभियंता शिवकांत जगन्नाथ मिरकले (वय ३६) यांचा मंगळवारी रात्री पिंपळे सौदागर येथे मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. औंध येथील सर्वोपचार रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. मात्र मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने नातेवाइकांनी पुन्हा उत्तरीय तपासणी करण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयाकडे मृतदेह दुसऱ्यांदा शवविच्छेदनासाठी (उत्तरीय तपासणी) पाठविला.
रात्री ११ वाजता मोटारीतून घरी जात असताना, शिवकांत यांचा पाठलाग करणारे इसम कोण होते, असा प्रश्न उपस्थित झाला असून, त्यांच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. दोनवेळा उत्तरीय तपासणी करावी लागल्याने अंत्यविधीसाठी लातूर येथे मृतदेह नेण्यास तब्बल १५ तासांहून अधिक विलंब झाला.
मूळचा लातूर येथील परंतु पुण्यात आयटी अभियंता म्हणून काम करणाºया शिवकांत मिरकले (वय ३६) यांचा मंगळवारी रात्री पिंपळे सौदागर येथे मृत्यू झाला. मोटारीतून ते पिंपळे सौदागर येथील ‘प्राईम प्लस’ या सोसायटीत घरी आले. पहिल्या मजल्यावरील सदनिकेपर्यंत जात असताना, भोवळ येऊन ते पडले. पोटात दुखत असल्याचे त्यांनी पत्नीला सांगितले. रुग्णवाहिका मागविली. मात्र रुग्णवाहिका येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.