अष्टविनायक परिसरातील ‘विजे’चे संकट टळणार
By admin | Published: June 3, 2015 04:23 AM2015-06-03T04:23:17+5:302015-06-03T04:23:17+5:30
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखालील अष्टविनायकाचे प्रथम तीर्थस्थान मोरगावसह थेऊर व सिद्धटेक चिंचवड येथील महान साधू मोरया गोसावी
मोरगाव : चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखालील अष्टविनायकाचे प्रथम तीर्थस्थान मोरगावसह थेऊर व सिद्धटेक चिंचवड येथील महान साधू मोरया गोसावी मंदिराच्या वास्तू आता सुरक्षित होणार आहेत. या वास्तू सध्या वीज पडण्याच्या संभाव्य धोक्यापासून मुक्त झाल्या आहेत. या ठिकाणी चिंचवड देवस्थान न्यासच्या वतीने येथे वीज प्रतिरोधक यंत्रणा असलेला आधुनिक मनोरा उभारला आहे.
येथील पुरातन व ऐतिहासिक मंदिरांच्या संवर्धनासाठी चिंचवड देवस्थान प्रशासनाने ही महत्त्वपूर्ण योजना राबविली आहे.
चिंचवड देवस्थान
न्यासच्या अधिपत्याखालील महान साधू मोरया गोसावी समाधिस्थळ, मंगलमूर्ती वाडा, मयूरेश्वर मंदिर मोरगाव, सिद्धिविनायक सिद्धटेकसह चिंतामणी थेऊर या ठिकाणी
याची जोडणी करण्यात आली आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण वाढले आहे.
उपकरण जोडण्यासाठी चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्र देव महाराज यांच्यासह विश्वस्त विश्राम देव, शैलेश वाघ, सतीश गडाळे, विजय संपगावकर यांनी विशेष प्रयन्न केले. (वार्ताहर)