नवीन ग्राहकांना वीज मीटर त्वरित द्यावेत
By Admin | Published: March 26, 2017 01:50 AM2017-03-26T01:50:41+5:302017-03-26T01:50:41+5:30
महावितरणने २४ तासांत वीजजोडणी योजना राबवण्याऐवजी एकेरी फेज व तिहेरी फेजचे मीटर देण्यास तीन महिने
निगडी : महावितरणने २४ तासांत वीजजोडणी योजना राबवण्याऐवजी एकेरी फेज व तिहेरी फेजचे मीटर देण्यास तीन महिने विलंब लावला जात आहे. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व शासनाच्या हितासाठी महावितरण विभागाने त्वरित सिंगल व थ्री फेजचे मीटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्य विद्युत संनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
वीज ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी, या हेतूने ऊर्जामंत्री चंद्रशेखर देवकुळे यांनी २०१६ मध्ये चार जिल्ह्यांसाठी पुण्यात प्रादेशिक कार्यालय सुरू केले. संचालक म्हणून संजय ताकसांडे यांची नियुक्ती केली. मात्र, कार्यालय सुरू होऊन अद्याप परिणाम झाला नाही. पुणे, कोल्हापूर, बारामती या तिन्ही परिमंडळांतील ग्राहकांकडून नवीन वीजजोडणीची मागणी असतानादेखील मीटर देण्यास विलंब होत आहे. तसेच औद्योगिक ग्राहकांनादेखील तत्पर मीटर न देता महिनोन्महिने मीटरसाठी वाट पाहावी लागत आहे. औद्योगिक वीजजोडणी रखडल्याने उद्योजकांचे नुकसान होत आहे. महावितरण ही वीजपुरवठा करणारी देशातील सर्वाधिक मोठी कंपनी मानली जाते. महावितरणकडून ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी व राज्याच्या तिजोरीत जास्तीत जास्त महसूल जमा व्हावा, ही अपेक्षा आहे. तसेच महावितरणकडून फ्लॅश, रोलेक्स, कॅपिटल यांसारख्या कंपन्यांकडून काही सदोष मीटरची खरेदी केल्याचे उघड झाले आहे. नादुरुस्त मीटर सॅप प्रणालीत त्या त्या कार्यालयात उपलब्ध आहे.(वार्ताहर)