पूर्ववैमनस्यातून चिंचवडगावात खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:46 AM2018-05-31T07:46:41+5:302018-05-31T07:46:41+5:30

चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला.

Pre-emptive murder in Chinchwadgaon | पूर्ववैमनस्यातून चिंचवडगावात खून

पूर्ववैमनस्यातून चिंचवडगावात खून

Next

पिंपरी : चिंचवड येथे तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना चिंचवड गाव चापेकर चौक येथे मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आकाश ऊर्फ रायबा तानाजी लांडगे (वय २४, रा. पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रशांत ज्ञानोबा वीर (वय ४४, रा. लक्ष्मीगंधा अपार्टमेंट, पागेची तालीम जवळ, चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रणजित बापू चव्हाण (वय २७, वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवड), स्वप्निल ऊर्फ बाबा मोरे (वय २३, रा भोई आळी, चापेकर चौक, चिंचवडगाव), प्रफुल्ल ढोकणे, सोन्या वराडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश आणि रणजित यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून भांडणे सुरू होती. मंगळवारी रात्री आकाश दुचाकीवरून जात होता. चापेकर चौकाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्याला अडविले. कोयता आणि लोखंडी रॉडने आकाशच्या पायावर आणि कमरेच्या खाली मागील बाजूला वार केले. तसेच सिमेंटची कुंडी आकाशच्या डोक्यात मारली. यामध्ये आकाश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला. आरोपी रणजित चव्हाण याच्यावर यापूर्वी ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाई केली आहे. बाबा मोरे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Pre-emptive murder in Chinchwadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.