प्रेमलोक पार्कलाच आयुक्तालय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:59 AM2018-05-13T06:59:11+5:302018-05-13T06:59:11+5:30
स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांची पाहणी केली. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील जागा सोईस्कर असल्याचे परिमंडल तीनचे
पिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या विविध ठिकाणच्या जागांची पाहणी केली. चिंचवड, प्रेमलोक पार्क येथील जागा सोईस्कर असल्याचे परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला कळविले़ मात्र काही संघटनांनी शाळेची इमारत पोलीस आयुक्तालयास देण्यास विरोध दर्शविला होता. तो विरोध मावळला असून, स्थानिकांनी या ठिकाणी आयुक्तालय होण्यास संमती दिली आहे. दरमहा १६ लाख २२ हजार ७६७ रुपये भाडे आकारणीचा दर महापालिकेने निश्चित केला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर दीड महिना उलटला, महाराष्ट्रदिनी पोलीस आयुक्तालय सुरू होणार, अशी नागरिकांना अपेक्षा होती. महाराष्टÑदिनाचा मुहूर्त टळला. आता १५ आॅगस्टचा मुहूर्त साधण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत.
शहरात पालिकेच्या १२ इमारती आणि ६ मोकळ्या जागा आहेत. त्यातून जागा निश्चित करण्यासाठी कामाचा वेग वाढवा, त्यानंतर मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही होईल, असा आदेश पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत पुणे शहर पोलीस अधिकाºयांना दिले होते. त्यानंतर जागा निश्चितीसाठी पोलीस अधिकाºयांची पुन्हा धावाधाव सुरू झाली आहे.