पेट्रोल कंपन्यांचे एजंट होण्यास तयार

By admin | Published: June 23, 2017 04:22 AM2017-06-23T04:22:03+5:302017-06-23T04:22:03+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बदलणाऱ्या किमतीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. त्या प्रमाणे त्याचे दरही बदलते असावेत

Prepared to become petrol companies' agents | पेट्रोल कंपन्यांचे एजंट होण्यास तयार

पेट्रोल कंपन्यांचे एजंट होण्यास तयार

Next

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बदलणाऱ्या किमतीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर अवलंबून असतात. त्या प्रमाणे त्याचे दरही बदलते असावेत, याच भूमिकेतून या पूर्वी वर्षातून अनेकदा आणि आता दररोज दर बदलाचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, दररोज बदलत जाणाऱ्या या भावाची अंमलबजावणी कशी करायची, असा मोठा प्रश्न पेट्रोल पंपचालकांसमोर आहे.
याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे आज देशातील अत्यंत थोड्या पेट्रोलपंपांवर अत्याधुनिक यंत्रणा आहे. आधीच थोड्या असलेल्या या अत्याधुनिक पंपांचे प्रमाण शहरी भागातच तुलनेने अधिक आहे. ही आधुनिक म्हणवली जाणारी यंत्रणा देखील आता कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे या बदलाला पेट्रोलपंप कसे सामोरे जातील.
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव बदलणार. आत्ताच्या पारंपरिक पद्धतीने पंपचालक संबंधित कंपनीकडून टँकरद्वारे पेट्रोल-डिझेल आणतो. त्यासाठी पैसेदेखील तो त्या पूर्वीच भरतो. जर आज आणलेल्या टँकरमधील काही लिटर इंधन शिल्लक राहिल्यास दुसऱ्या दिवशी काय करायचे, त्याची किंमत कमी-अधिक असल्यास त्याची जोखीम कोणी पत्करायची.
या मुळे आधीच अडचणीत असणाऱ्या पेट्रोल पंपांसमोरील अडचणीत वाढच होईल. आदल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जास्त असतील, दुसऱ्या दिवशी त्यात घट झाल्यास शिल्लक इंधनाचा भुर्दंड कोणाच्या माथी पडणार? हा खरा सवाल आहे.
अनेक पेट्रोल पंपचालकांना दोन अथवा तीन पाळ्यांमध्ये सेवा द्यावी लागते. त्या नुसार कर्मचाऱ्यांची संख्या कमी-जास्त होते. किमान वेतनानुसार या सर्वांचे वेतन आणि देखभाल खर्चदेखील पंपचालकांना उचलावा लागतो. यात काही लाख रुपये खर्ची पडतात. या निर्णयामुळे पेट्रोलपंपचालक आणखी अडचणीत येतील.
अजून आपला देश संपूर्ण स्वयंचलित पेट्रोलपंप या संकल्पनेपर्यंत पोहोचलेला नाही. त्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागेल. कारण तशा तंत्रज्ञानाची उपलब्धता आपल्याकडे नाही. परदेशात वाहनमालकालाच पेट्रोल भरणे आणि त्याचे पैसे अदा करणे अशी सर्व कामे करावी लागतात. आज आपल्याकडे ही कामे कामगारांकडूनच केली जातात. या शिवाय गाडीच्या चाकात हवा भरणे, चारचाकी वाहनांच्या काचा साफ करून देण्याची सेवादेखील दिली जाते.
नवीन बदल स्वीकारायला पेट्रोल पंप चालकांची ना अजिबात नाही. मात्र, त्यासाठीची सक्षम यंत्रणा पेट्रोलियम कंपन्यांनी उभारली पाहिजे. अगदी पेट्रोल पंपचालक ‘मध्यस्थाची’ (एजंट) भूमिका देखील पार पाडायला तयार आहे. कंपन्यांनी स्वयंचलित यंत्रणा प्रत्येक पंपावर बसवावी. त्यानुसार दररोजच्या पेट्रोल-डिझेलच्या बदलणाऱ्या किमती बदलाव्यात. त्या बदल्यात योग्य मोबदला (कमिशन) पेट्रोल पंपचालकांना दिला जावा. हा बदल होईपर्यंत दररोज इंधनाच्या रक्कम बदलण्याचा निर्णय व्यवहार्य होणार नाही. ग्रामीण भागात असा दर बदलणे अधिकच अडचणीचे होईल. अनेक ठिकाणी मोबाईलला देखील रेंज नसते, अशा ठिकाणी मग काय करणार? तरीही सरकारला हा निर्णय राबवायचा असल्यास आमची
पेट्रोल-डिझेल वितरण करायची तयारी आहे. त्यांनी वितरण होणाऱ्या इंधनाचे पैसे द्यावे आणि शिल्लक राहणाऱ्या इंधनाची जबाबदारी स्वीकारावी.
देशात सुमारे ९० हजार पेट्रोलपंप आहेत. या निर्णयामुळे येथील व्यवहारच विस्कळीत होण्याचा धोका आहे. या सर्व बाबी संघटना म्हणून पेट्रोलियम मंत्रालय आणि पेट्रोलियम कंपन्यांकडेदेखील मांडणार आहोत.

Web Title: Prepared to become petrol companies' agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.