मावळात निवडणुकीसाठी सज्जता

By admin | Published: February 20, 2017 02:45 AM2017-02-20T02:45:51+5:302017-02-20T02:45:51+5:30

येत्या २१ फेबुवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी येथील मावळ तहसील कार्यालय सज्ज झाले आहे.

Preparedness for elections in Maval | मावळात निवडणुकीसाठी सज्जता

मावळात निवडणुकीसाठी सज्जता

Next

वडगाव मावळ : येत्या २१ फेबुवारी रोजी होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी येथील मावळ तहसील कार्यालय सज्ज झाले आहे.
कार्यालय परिसरात गेल्या सात ते आठ दिवसांपासून करत असलेल्या साफसफाई व उभारलेल्या मांडवामुळे तहसील कार्यालयाला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. गेल्या महिनाभरापासून तहसील कार्यालयात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणत वाढली आहे. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. सर्व कर्मचाऱ्यांचा सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारीदेखील रात्री उशिरा तहसील कार्यालयात काम करताना पाहण्यास मिळत आहेत. पाच वाजले, की कार्यालय बंद करून घरी जाण्याची घाई करणारे शासकीय कर्मचारी रात्री उशिरा मतदान पेट्या चेक करणे, याद्या चेक करणे व इतर कामे करताना दिसत आहेत. अतिशय जुन्या असलेल्या महसूल भवन व तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या तिन्ही बाजूला भव्य मांडव घातल्यामुळे तहसील कार्यालय सुशोभीत झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार्यालयाचा परिसर कर्मचारी स्वच्छ करीत आहेत. कार्यालयाच्या आवारात खड्डे असणाऱ्या ठिकाणी खडी टाकून तेथे सपाटीकरण करण्यात आले आहे. स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्यात आली आहे. निकालाच्या दिवशी नागरिक व अधिकाऱ्यांना वाहने लावण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी देखील आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तहसील परिसरात मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले आहे.
गैरप्रकार रोखण्यास पोलिस सज्ज
निवडणूक म्हटले, की मतदार राजाची हौसमौज करण्याचा प्रयत्न अनेक उमेदवारांकडून केला जातो. मतदाराला खूश करण्यासाठी उमेदवार कसलीही हयगय करीत नाहीत. अनेक उमेदवार मतदारांना पैसे, भोजन, मद्य, भेटवस्तू देऊन मते फिरविण्याचा किंवा कायम राखण्याचे प्रयत्न करीत असतात. प्रसंगी धाकदपटशा दाखवून मते देण्यास भाग पाडले जाते, असे अनेकदा स्पष्ट झाले आहे. असे प्रयत्न रोखण्यासाठी वडगाव पोलीस सज्ज झाले आहेत.
तालुक्यात २९३ पोलीस कर्मचारी , ५४ होमगार्ड व १६ अधिकारी नेमण्यात आले आहेत. भरारी पथकाचा माध्यमातूनदेखील करडी नजर पोलीस ठेवून आहेत. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे. निवडणूक विभागाचे कर्मचारी व अधिकारीही निवडणूक निकोप वातावरणात व्हावी, यासाठी सज्ज आहेत. (वार्ताहर)

११ एसटी बस आरक्षित : प्रवाशांची होणार गैरसोय

 निवडणुकीसाठी तालुक्यातील २१६ मतदान केंद्रावर मतदान अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्रे व साहित्यांची ने-आण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तळेगाव विभागातील ११ एसटी बस ताफा निवडणूक आयोगाने आरक्षित केल्या आहेत. काही बस फेऱ्या आणि मुक्कामाच्या गाड्या तीन दिवस रद्द केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाच गट व पंचायत समितीच्या १० गणासाठी मतदान केंद्रावर मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रत्येक ठिकाणी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने वाडी, वस्ती, गाव याठिकाणी मतदान केंद्राची उभारणी केली आहे.
  या मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त, कर्मचारी, मतदान यंत्रे व साहित्याची ने-आण करण्यासाठी तळेगाव आगारातून एसटी बस पुरवल्या
जाणार आहेत. याचा परिणाम लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.
तळेगाव आगर व्यवस्थापक तुषार माने
यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगारात ४९ एसटी बस असून यातील १५ बस या राजगुरुनगर येथे निवडणुकीसाठी पाठविण्यात येणार आहेत. ११ बस मावळमध्ये पाठविण्यात येणार आहे.
 त्यामुळे मावळ मध्ये १९ फेबुवारी ते २१ फेबुवारी दरम्यान निगडे, महागाव, उकसान, मोर्वे या मुकामाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या असून, यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Web Title: Preparedness for elections in Maval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.