लोणावळा ग्रामीण पोलिसांची ३५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 04:55 PM2019-04-23T16:55:58+5:302019-04-23T17:11:57+5:30
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलिसांनी दक्षता घेतली आहे.
लोणावळा : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तब्बल ३५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर संवेदनशिल गावांमध्ये भांडण तंटे करणाऱ्या 12 जणांना निवडणूक काळात मावळ तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच अवैध दारु निर्मिती व विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मुंबई प्रोबेशन अधिनियमांर्तंगत कारवाई करण्यात आली आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याकरिता पोलिसांनी दक्षता घेतली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर पोलीसांची नजर राहणार असून त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. वरसोली टोल नाक्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिर स्थावर तपासणी पथक यांनी संयुक्तरित्या वाहनांची तपासणी करत आतापर्यत 11 लाख 79 हजार 200 रुपयांची रोकड जप्त केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणाºयांवर कडक कारवाई करण्याचा इशारा लुकडे यांनी दिला आहे. हद्दीतील जी गावे संवेदनशिल आहेत, त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. लुकडे म्हणाले नागरिकांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, कोणी अमिष अथवा धाक दडपशाही करत असल्यास नागरिकांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, आचारसंहितेचा भंग करणाºयांची गय केली जाणार नाही. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी केले आहे.