उत्पादन घटूनही भाताचा भाव कमीच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 01:17 AM2018-11-17T01:17:37+5:302018-11-17T01:18:05+5:30
तालुक्यात या वर्षी सरासरी भात उत्पादन २३.५० क्विंटल आहे. तर मागील वर्षी सरासरी ३३.५० क्विंटल उत्पादन झाले
कामशेत : या वर्षी तालुक्यात सुमारे १२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड झाली होती. पण सप्टेंबर महिन्यात दाणे भरण्याच्या काळात पावसाने खंड दिल्याने भात पिकाच्या उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी घट आली आहे. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले होते. उत्पादन घट आल्याने या वर्षी शेतकºयांना भाताचा बाजार वाढण्याची अपेक्षा होती. मात्र या वर्षी अजूनही भाताचे दर स्थिर आहेत. त्यामुळे भात उत्पादक शेतकºयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात या वर्षी सरासरी भात उत्पादन २३.५० क्विंटल आहे. तर मागील वर्षी सरासरी ३३.५० क्विंटल उत्पादन झाले असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. मागील वर्षी इंद्रायणी भातास २१०० ते २२०० रुपये प्रति क्विंटल असा दर होता. तर या वर्षी २२०० ते २४०० प्रति क्विंटल इतका दर आहे. तसेच कोळंब जातीच्या भातास १७०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. तर तो मागील वर्षी प्रमाणेच स्थिर आहे आणि आंबेमोहर भाताचा दरदेखील मागील वर्षीप्रमाणेच या वर्षी २५ ते ३० रुपये प्रति क्विंटल असा स्थिर आहे. या वर्षी उत्पादनात घट झाली असूनदेखील भाव स्थिर असल्याने शेतकºयांमध्ये व्यापाºयांच्या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाची भात पिकास १७५० ते १७९० प्रति क्विंटल इतकी आधारभूत किंमत असल्याने व्यापाºयांना दरासंदर्भात शेतकºयांना काही बोलता येत नसल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, भात पिकाची प्रतवारी कशी करावी व त्याची गुणवत्ता कशी तपासली जावी या विषयी शासनाने व्यापाºयांना कोणत्याही प्रकारचे नियम व अटी लावत नसल्याने व्यापारी म्हणेल तीच गुणवत्ता शेतकºयांना मान्य करून आपले धान्य विकावे लागत असल्याची परिस्थिती सध्या तालुक्यात आहे. यामुळे भात पिकाचा दर्जा व गुणवत्ता ठरविण्याची एक नियामक पद्धत शासनाने अवलंबण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
1मावळात सरासरी ४ लाख २८ हजार ८०० क्विंटल इतके भाताचे उत्पादन होत असते. मावळात उत्पादित होणाºया भातास पुणे जिल्ह्यातील लोकांकडून प्रचंड मागणी आहे. त्यात इंद्रायणी तांदूळ लांबीला लहान असल्याने इतरत्र त्यास मागणी कमी आहे. तरीही मावळातील इंद्रायणी तांदूळ खूप प्रसिद्ध आहे.या वर्षी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्याव्यतिरिक्त इतर तालुक्यांत पाऊस कमी प्रमाणात पडल्याने भात पिकाच्या उत्पादनात घट झालेली आहे. यामुळे भाताचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र शेतकºयांची भात विकण्याची घाई यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याचाच फायदा तांदूळ व्यापारी व दलाल यांनी घेतला असल्याचे काही भात उत्पादक शेतकरी सांगत आहेत.
मावळ तालुक्यातील भातपीक हे शेतकºयाचे प्रमुख पीक आहे. या पिकाची विक्री केल्यानंतरच हंगामी पिके घेण्यासाठी शेतकरी भांडवलाची निर्मिती करीत असतात. यामुळेच शेतकºयांना धान्य विकण्याची घाई असते. यावर्षी भात उत्पादन ७५ टक्के आहे. शिवाय पिकाचा दर्जाही उत्तम आहे. त्यामुळे भाताला मागणीही खूप आहे. तरीही भाताचे भाव स्थिर असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
सप्टेंबर महिन्यात पावसाने खंड दिल्याने भात उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट आल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकºयांना नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र पाणी उपलब्ध असणाºया भात उत्पादक शेतक ºयाचे भात उत्पादन उत्तम झाले आहे. काही शेतकºयांनी वेगळे प्रयोग केल्याने त्यांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
- देवेंद्र ढगे, तालुका कृषी अधिकारी