अधिकारी पदाधिकाºयांच्या खासगी दौºयावर भर, महापौर, उपमहापौर, आयुक्त दौºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:40 AM2017-11-20T00:40:18+5:302017-11-20T00:40:34+5:30

पिंपरी : पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाºया महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी आणि अधिकाºयांनी खासगी दौºयांवर भर दिला आहे.

On the private visit to the officer's office, the mayor, the deputy mayor, the commissioner's visit | अधिकारी पदाधिकाºयांच्या खासगी दौºयावर भर, महापौर, उपमहापौर, आयुक्त दौºयावर

अधिकारी पदाधिकाºयांच्या खासगी दौºयावर भर, महापौर, उपमहापौर, आयुक्त दौºयावर

Next

पिंपरी : पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणाºया महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाºयांनी आणि अधिकाºयांनी खासगी दौºयांवर भर दिला आहे. चिंचवडचे महापौर नितीन काळजे स्पेन दौºयावर असतानाच आयुक्त श्रावण हर्डीकर शनिवारी स्वीडनला रवाना झाले. त्यानंतर मुख्य लेखापाल राजेश लांडे आणि मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण हेदेखील एका खासगी संस्थेच्या प्रायोजकत्वाद्वारे फिलीपाईन्स दौºयाला गेले आहेत.
महापालिकेत अधिकारी-पदाधिकाºयांमध्ये विदेशवारीची स्पर्धा सुरू आहे. दौºयावर नाहक करदात्या नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी
केली जात आहे. काही दिवसांपूर्वी महिला व बाल कल्याण समितीचे सदस्य ठेकेदार प्रायोजकत्व घेऊन सिंगापूर दौरा करून आले. त्यानंतर लगेच बीआरटीविषयक अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवक अहमदाबादला जाऊन आले. त्यावर ५० लाख रुपयांची उधळपट्टी झाली.
दौºयांवर टीका सुरू असतानाच महापौर नितीन काळजे स्पेन देशाच्या दौºयावर गेले आहेत. स्पेन देशातील बार्सिलोना शहरात १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या ह्यस्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड काँग्रेस २०१७ह्ण या परिषदेत ते सहभागी झाले आहेत. मंगळवारी महापौर परतणार आहेत. महापौर शहरात येणार तोच महापालिका आयुक्त हर्डीकर हे शनिवारी स्वीडनला रवाना झाले. स्वीडनमधील स्वीडीश इन्स्टिट्यूटमध्ये स्मार्ट सिटींचा शाश्वत विकासाचे प्रशिक्षण घेणार आहे. आठवड्याच्या प्रशिक्षणानंतर ते २७ नोव्हेंबरला महापालिकेत रुजू होतील.
>अतिरिक्त आयुक्तपदी प्रवीण आष्टीकर
पिंपरी : महापौर नितीन काळजे स्पेन दौºयावर आहेत़ तर आयुक्त श्रावण हर्डीकर स्वीडन दौºयावर आहेत. सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्तपदाचा कारभार डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे सोपविला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर परदेश दौºयावर रवाना झाले आहेत. गुजरात दौºयाला जाताना त्यांनी पदभार कोणाकडेही दिला नव्हता. तसेच सह आयुक्त दिलीप गावडे वैद्यकीय रजेवर आहेत.
दरम्यान स्वीडन परदेश दौºयावर जाताना आयुक्त पदाचा कार्यभार कोणाकडे सोपविणार याबाबत उत्सुकता होती. आठवडाभरासाठी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे येणार अशी चर्चा होती. मात्र, त्याच्याऐवजी पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते येणार अशी चर्चा होती. मात्र, आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे दिला आहे.
>हाच का पारदर्शक कारभार?
मुख्य लेखापाल लांडे आणि पोमण हेसुद्धा पाच दिवसांच्या फिलीपाईन्स दौºयावर रवाना झाले आहेत. महापालिका ठेवींच्या व्याजदरात वाढ केल्याबद्दल लांडे यांचा सत्कार केला होता. हा सत्कार होत नाही तोच लांडे विदेश दौºयावर गेले आहेत. बोनस न घेणारे लांडे यांच्या दौºयाची महापालिकेत चर्चा आहेत.

Web Title: On the private visit to the officer's office, the mayor, the deputy mayor, the commissioner's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.