खासगीकरणाचा घाट, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:00 AM2018-02-01T03:00:16+5:302018-02-01T03:00:28+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुभवी अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी आॅनलाइन निविदाही मागविल्या असून, ५६ वास्तुविशारदांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. त्यांना इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा कामाच्या प्रकारानुसार ५० लाखांपासून १० कोटीच्या पुढील खर्चाच्या कामांसाठी नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीवर आर्थिक भार येणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनुभवी अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी आॅनलाइन निविदाही मागविल्या असून, ५६ वास्तुविशारदांनी महापालिकेकडे नोंदणी केली आहे. त्यांना इमारत बांधकाम, लॅण्डस्केपिंग, इंटेरिअर डिझायनिंग अशा कामाच्या प्रकारानुसार ५० लाखांपासून १० कोटीच्या पुढील खर्चाच्या कामांसाठी नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका तिजोरीवर आर्थिक भार येणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबविण्यात येतात. या अंतर्गत करण्यात येणाºया लॅण्डस्केपिंग, विविध प्रकारच्या इमारतींच्या संकल्पनांसाठी, बांधकामांसाठी आणि बांधकाम परवानगी घेण्यासाठी पुरेसे तांत्रिक नैपुण्य महापालिकेतील अधिकाºयांकडे उपलब्ध आहे. महापालिकेच्या अभियंत्यांना पगारही मोठ्याप्रमाणावर दिले जातात. कार्यक्षमता असतानाही खासगीरणाचा घाट घातला जात आहे.
गेल्या काही वर्षात महापालिकेत रस्ते, उड्डाणपूल बांधण्यापासून भाजी मंडईच्या विस्तारापर्यंत सर्वच छोट्या-मोठ्या कामांसाठी वास्तुविशारद नेमण्याचे पेव फुटले आहे.
या वास्तुविशारदांवर प्रकल्प रकमेच्या दोन ते अडीच टक्के रुपयांची उधळपट्टी केली जाते. महापालिकेत तज्ज्ञ अभियंते कार्यरत असतानाही आता प्रत्येक कामासाठी वास्तुविशारद नेमण्याचा घाट घातला आहे.
वास्तुविशारदांचे पॅनेल तयार करण्यासाठी एकूण ५६ वास्तुविशारदांपैकी एकूण ४२ वास्तुविशारदांनी कागदपत्रे सादर केली आहेत. त्यांच्या कागदपत्रांची छाननी केली. त्यानुसार, त्यांना तीन प्रकारची कामे देण्यात येणार आहेत. पहिल्या गटातील वास्तुविशारदांना इमारत बांधकाम विषयक कामे देण्यात येणार आहेत. दुसºया गटातील वास्तुविशारदांना लॅण्डस्केपिंगची कामे, तिसºया गटातील वास्तुविशारदांना इंटेरिअर डिझायनिंगची कामे देण्यात येणार आहेत.
वास्तुविशारदांचे पॅनेल
वास्तुविशारदांचे पॅनेल तयार करण्यासाठी मसुदा तयार केला आहे. त्यास आयुक्तांनीही मान्यता दिली आहे. हे पॅनेल नियुक्त करण्यासाठी महापालिकेने जाहिरात दिली होती. त्यानुसार, पहिल्या गटात १९ वास्तुविशारदांनी तीन हजार रुपये महापालिका शुल्क आणि तीन हजार रुपये निविदा शुल्क भरून आॅनलाइन कागदपत्रे सादर केली. दुसºया गटात १५ वास्तुविशारदांनी नोंदणी केली. या वास्तुविशारदांना दिलेल्या मुदतीत आॅनलाइन पद्धतीने कागदपत्रे भरता आली नाहीत. त्यांच्याकडून महापालिका कोशागारात शुल्क भरून आॅफलाइन पद्धतीने कागदपत्रे घेतली. तर तिसºया गटातही आठ वास्तुविशारदांनी आणि चौथ्या गटात १४ वास्तुविशारदांनी आॅफलाइन नोंदणी केली. मात्र, त्यांनी आॅफलाइन पद्धतीनेही कागदपत्रे सादर केलेली नाहीत.