भोसरीतील शिवसेनेच्या बैठकीत राडा, पदाधिकाऱ्यांमध्ये हमरी-तुमरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 03:04 PM2019-10-02T15:04:51+5:302019-10-02T15:05:35+5:30
महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी...
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या आज (बुधवारी) आयोजित बैठकीत पदाधिका-यांमध्ये चांगलाच राडा झाला. पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हमरी-तुमरी होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेनेकडे मतदारसंघ घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु, महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पुढील भूमिका ठरविण्यासाठी भोसरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज भोसरीत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत एक महिला पदाधिकारी आणि एका पदाधिकाऱ्यामध्ये जोरदार वादावादी झाली.
एक पदाधिकाऱ्यांने माजी खासदारांच्या कार्यशैलीबाबत नापसंती व्यक्त करत विविध आरोप केले. त्याला एका महिला पदाधिका-याने आक्षेप घेतला. त्यावरुन दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. रस्त्यावरच दोघांमध्ये भांडण झाले.
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना महायुती आणि आघाडीच्या पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहे. यामध्ये तिकीट न मिळालेल्या नाराज उमेदवारांच्या नाराजीचे रूपांतर एकतर बंडखोरीत किंवा वादावादीत होत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये देखील शिवसेनेने आयोजित केलेल्या बैठकीत असाच राडा झालेला पाहायला मिळाला. आपला उमेदवार जाहीर केला आहे. बैठकीत झालेल्या वादावादीतून एका महिलेच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे.