रोडरोमिओंचा त्रास, शाळा, महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:02 AM2018-04-07T03:02:18+5:302018-04-07T03:02:18+5:30

निगडी येथील महापालिका शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये काही वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात.

 The problems of roadromycms, the fear of fear in the schools and colleges | रोडरोमिओंचा त्रास, शाळा, महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण

रोडरोमिओंचा त्रास, शाळा, महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण

Next

निगडी - येथील महापालिका शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयात डॉक्टर आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये काही वेळा वादावादीचे प्रसंग उद्भवतात. असे प्रकार रोखण्यासाठी निगडी, यामुनानगर, सेक्टर २२ येथील शाळा महाविद्यालये तसेच रुग्णालय परिसरात महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची
मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. शाळा भरताना व शाळा सुटताना शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओ दुचाकीचा कर्णकर्कश हॉर्न वाजवत घिरट्या घालतात. या रोडरोमिओंना परिसरातील नागरिकांनी हटकल्यास परिसरातील नागरिकांना दमदाटी होते.
यामुळे रोडरोमिओंवर नजर ठेवण्यासाठी शाळा महाविद्यालयासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे. तसेच सेक्टर २२ मधील महापालिकेच्या दवाखाण्यात निगडी, यामुननागर, रुपीनगर आदी भागातून आपल्या नातेवाइकांसोबत रुग्ण तपासणीसाठी येत असतात. यामुळे या दवाखान्यात रोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
रुग्णालयातही अनेकदा रुग्णांचे नातेवाईक व डॉक्टरांत वादावादीचे प्रसंग घडतात तसेच रुग्णालयाबाहेर रुग्णांच्या रोज मोठ्या रांगा असतात. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने दवाखाण्यासमोर सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत आहे. रुग्णालयात अनेकवेळा कामाशिवाय देखील नागरिक हिंडताना दिसून येतात.
काही रोडरोमिओ भरधाव वेगाने गाड्या चालविताना त्यामुळे विद्यार्थिंनीना त्रास होत आहे. रोडिरोमिओंकडून कर्णकर्कश हॉर्न देखील वाजविला जातो. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

भरधाव वेगाने हाकल्या जातात गाड्या
कर्णकर्कश हॉर्नचा होतोय त्रास

शहरात शाळा महाविद्यालये, दवाखाना परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण आहे. यामुळे अशा रोडरोमिओंवर नजर ठेवण्यासाठी शाळा, महाविद्यालय व दवाखाण्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे.
- तानाजी काळभोर, अध्यक्ष, खंडोबा देवस्थान ट्रस्ट,निगडीगाव

Web Title:  The problems of roadromycms, the fear of fear in the schools and colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.