भुयारी मार्गात समस्यांचा अडथळा, वाहतूककोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 06:33 AM2017-08-30T06:33:01+5:302017-08-30T06:33:04+5:30

शगून चौकात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता या मार्गाने हायवेला जाणे सोयीस्कर व्हावे याकरिता पिंपरीतील साई चौकात महापालिकेतर्फे किंमतराव आसवाणी भुयारी मार्ग बनविला होता

Problems in the way of obstacles, traffic congestion | भुयारी मार्गात समस्यांचा अडथळा, वाहतूककोंडी

भुयारी मार्गात समस्यांचा अडथळा, वाहतूककोंडी

Next

पिंपरी : शगून चौकात होणारी वाहतूककोंडी लक्षात घेता या मार्गाने हायवेला जाणे सोयीस्कर व्हावे याकरिता पिंपरीतील साई चौकात महापालिकेतर्फे किंमतराव आसवाणी भुयारी मार्ग बनविला होता. मात्र, याउलट सध्या नागरिकांना या मार्गातून प्रवास करताना समस्यांचा अडथळा पार करावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या भुयारी मार्गात खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली आहे. भुयारी मार्गातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. साई चौकातून हायवेकडे जाताना मार्गाच्या सुरुवातीला मोठे खड्डे पडले असून मार्गाच्या दुसºया बाजूलाही मोठे खड्डे पडले आहेत. तसेच या ठिकाणी ड्रेनेजसाठी टाकण्यात आलेले लोखंडी पाईप रस्त्यावर आल्याने वाहन घसरून अपघात होतात. मार्गात प्रवेश करताना चारचाकी व दुचाकी वाहनचालकांना वाहन चालविणे कठीण जाते. खड्ड्यामुळे वाहने खड्ड्यात आदळून वाहनांचे प्रंचड नुकसान तर होतेच त्याबरोबरच वाहन घसरून अपघाताचीही दाट शक्यता आहे. तसेच या पुलाला खालच्या भागास भेगा पडल्या असून यातून सतत पावसाचे पाणी पडत असल्यामुळे वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे पार्क केलेली असतात़ वाहनचालकांना पुढे येऊन वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

भुयारी मार्गाच्या बाहेरील बाजूस सायंकाळी खाद्यपदार्थांच्या गाड्या, स्टॉल्स लावलेले असतात. परिसरातील नागरिक, खरेदी करण्यासाठी आलेले ग्राहक या ठिकाणी आपली वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग करून खरेदीसाठी व खाद्यपदार्थ खाण्यासाठी जातात. त्यामुळे रस्ता अरुंद बनतो. परिणामी या ठिकाणी सायंकाळी वाहतुककोंडीत भर पडते. काही वाहनचालक वळणावर चारचाकी गाड्या उभ्या करतात. त्यामुळे प्रसंगी अपघातासह निमंत्रणही मिळते. तसेच खाद्यपदार्थ खाण्यासाठी आलेले ग्राहक या ठिकाणी थांबल्याने गर्दी वाढते. खाद्यविक्रेते त्यांच्याकडील खरकटे, उरलेले अन्न, डिश या ठिकाणी पाहिजे त्या टाकतात. त्यामुळे दुर्गंधीचा त्रासही वाहनचालकांना सहन करावा लागतो.

Web Title: Problems in the way of obstacles, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.