मोबाईल व्हॅनद्वारे ‘जलयुक्त शिवार’चा प्रचार
By admin | Published: March 30, 2015 05:28 AM2015-03-30T05:28:20+5:302015-03-30T05:28:20+5:30
शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलशिवार अभियान लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ४८ मोबाईल व्हॅन बुधवारपासून
पुणे : शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलशिवार अभियान
लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ४८ मोबाईल व्हॅन बुधवारपासून
राज्यातील २ हजार ५८२ गावांत फिरणार आहेत. पुणे विभागातील ९००; तर पुणे जिल्ह्यातील १९५ गावांचा समावेश आहे. यासाठी ८५ लाखांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे.
जलसंधारण विभागामार्फत पुढील ५ वर्षांत राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या वर्षासाठी सुमारे ६ हजार गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
या गावांपैकी पुणे व औरंगाबाद
महसुली विभागातील २ हजार ५८२ गावांमध्ये महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजनेबाबत, तसेच जलयुक्त शिवार अभियानाबाबत ग्रामीण भागातील जनतेमध्ये प्रचार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही व्हॅन १ एप्रिलपासून १
मे २०१५ पर्यंत महिनाभर प्रचार करणार आहे. यासाठी पुणे व औरंगाबाद विभागासाठी ४८ व्हॅन भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. ५०
गावांकरिता १ व्हॅन, असे प्रमाण असणार आहे. (प्रतिनिधी)