पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात केला तब्बल दोन कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 07:29 PM2020-07-20T19:29:25+5:302020-07-20T19:34:14+5:30

लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंध व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली.

Property worth Rs 2.65 crore seized during lockdown by Pimpri-chinchwad police | पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात केला तब्बल दोन कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात केला तब्बल दोन कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देविविध प्रकारची कारवाई : पिंपरी-चिंचवड पोलिसांची कामगिरी३९२ जणांना पोलिसांनी अटक तर दोन कोटी १८ लाख ४० हजार ८५० रुपयांचा माल जप्त

पिंपरी : कोरोना महामारी रोखण्यासाठी पोलिसांनी लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला. त्यासाठी लॉकडाऊन काळात विविध प्रकारची कारवाई करून दोन कोटी ६५ लाख ७५ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रतिबंधित मालाची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणे, गुटखा, अमली पदार्थ बाळगणे आणि त्याची विक्री करणे, जुगार खेळणे यांसारख्या कारवाईचा यात समावेश आहे. 
लॉकडाऊन काळात प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंध व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यांत ५३४ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यात ३९२ जणांना पोलिसांनीअटक केली. तर दोन कोटी १८ लाख ४० हजार ८५० रुपयांचा माल जप्त केला. जुगार खेळल्याप्रकरणी ५१ गुन्हे दाखल करून १४४ जणांना अटक केली. त्यात तीन लाख ८३ हजार ६८१ रुपयांचा माल जप्त केला. 
अवैध गुटखा बाळगणे, विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी १४ गुन्हे दाखल करून २० आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३६ लाख ७१ हजार ५१९ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. अवैध तंबाखूजन्य पदार्थ विक्रीप्रकरणी १२ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ५४ हजार २६० रुपयांचा माल जप्त केला. अंमली पदार्थ विक्रीप्रकरणी १३ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली. त्यांच्याकडून पाच लाख २५ हजार २०० रुपये किमतीचा १५ किलो ९७० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केला.
लॉकडाऊनच्या काळात दुकाने सुरू ठेवणे, खासगी व व्यापारी वाहन चालविणे, फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणाºया ३०,८२१ जणांवर पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये खटले दाखल केले. तर मास्क न घालणाºया ६६६४ नागरिकांवर देखील भादवि कलम १८८ व साथ रोग प्रतिबंकध कलम ३ अन्वये कारवाई केली. 

विनाकारण बाहेर फिरणे तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ५१०२ वाहने जप्त केली. त्यामध्ये दुचाकी, तीनचाकी, चारचाकी आणि अन्य वाहनांचा समावेश आहे. पोलिसांनी कंटेन्मेंट झोनमध्ये ११५८ जणांवर कारवाई केली. बेकायदेशीररित्या नमाज आणि मिरवणुकीसाठी एकत्र आल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल केले आहेत. जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने विक्री करणे, जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ गुन्हे दाखल केले आहेत. बेकायदेशीर कामगार वाहतूक केल्याप्रकरणी २२ गुन्हे तर सोशल मीडियावर कोरोना काळात अफवा आणि चुकीची माहिती पसरविल्याबाबत पोलिसांनी सात गुन्हे दाखल केले. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी १६ गुन्हे दाखल आहेत.

लॉकडाऊनमध्ये दिले ९१८९६ पास
पिंपरी - चिंचवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात ९१८९६ ई- पास दिले. नागरिकांनी नियंत्रण कक्षाला ६६३८ कॉल केले. तसेच व्हॉटसअ?ॅपवर २२४१ संदेश प्राप्त झाले. त्यानुसार पोलिसांनी नागरिकांना प्रतिसाद देऊन त्यांना मदत उपलब्ध करून दिली.

महापालिका व पोलिसांचे संयुक्त पथक
लॉकडाऊन काळात विविध प्रकारच्या कारवाईसाठी महापालिका व पोलिसांचे संयुक्त पथक कार्यान्वित होते. या पथकाने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली. यात १८२० हातगाड्या जप्त करून ५४ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला. तीन व चारचाकी १६९ टेम्पो जप्त करून २५ लाख ३५ हजारांचा दंड वसूल केला. प्लास्टिक कॅरेट, वजन काटा आदी किरकोळ वस्तू जप्त करून २५ लाख वसूल केले. या कारवाईत एकूण एक कोटी चार लाख १५ हजारांचा दंड वसूल केला.

Web Title: Property worth Rs 2.65 crore seized during lockdown by Pimpri-chinchwad police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.