प्रस्तावित निगडी मेट्रो : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला खोडा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 03:07 AM2017-08-10T03:07:35+5:302017-08-10T03:08:01+5:30

महापालिकेत भाजपााची सत्ता आल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात रखडलेल्या निगडी भक्ती-शक्ती चौक येथील उड्डाणपुलाचा विषय मंजूर केला. उड्डाणपुलावरून सत्ताधारी आणि प्रशासनात मतभेद दिसून येत आहे.

Proposed Nigdi Metro: Dedication-power flyover | प्रस्तावित निगडी मेट्रो : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला खोडा  

प्रस्तावित निगडी मेट्रो : भक्ती-शक्ती उड्डाणपुलाला खोडा  

Next

पिंपरी : महापालिकेत भाजपााची सत्ता आल्यानंतर राष्टÑवादी काँग्रेसच्या कालखंडात रखडलेल्या निगडी भक्ती-शक्ती चौक येथील उड्डाणपुलाचा विषय मंजूर केला. उड्डाणपुलावरून सत्ताधारी आणि प्रशासनात मतभेद दिसून येत आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास भाजपा आग्रही आहे़ मात्र, भक्ती-शक्ती चौकातील राष्टÑवादीच्या कालखंडातील आराखडा बदलण्यात यावा, अशी मागणी दुसºया गटाने केली आहे. हा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामास खोडा बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँगे्रसने महापालिका निवडणुकीपूर्वी भक्ती-शक्ती चौकात उड्डाणपूल उभारण्याचा विषय स्थायी समितीसमोर आणला होता. मात्र, स्थानिक नेत्यांच्या श्रेयवादामुळे या विषयाला खोडा घातला होता. महापालिका निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपाने नव्वद कोटींचा विषय स्थायी समितीसमोर आणला आणि हा विषय मंजूरही करण्यात आला. या प्रकल्पाची पायाभरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शनिवारी होणार आहे. या कामास भाजपाच्या जुण्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. आराखडा न बदलल्यास न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांकडेही याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे मेट्रोबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
भक्ती-शक्ती चौक ते दापोडी हा रस्ता पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे विकसित केला आहे. या मार्गावर सार्वजनिक बीआरटीएस बस वाहतूक सुरू करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. या चौकात वाहतुकीमुळे लहान-मोठे अपघात होत असल्याने या चौकात ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सुमारे १३५ कोटींच्या खर्चाला महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता दिली होती. मात्र, त्यानंतर शंभर कोटींच्या कामावरून श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले. त्यानंतर हा विषय मंजूर झाला नाही. भाजपाची सत्ता आल्यानंंतर १०३ कोटी ७ लाखांची निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यातील बी. जी. शिर्के या कंपनीने ७२ कोटी ४० लाखांची निविदा सादर केली. तसेच उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर उभारण्यासाठी भक्ती-शक्ती चौकातील विविध सेवावाहिन्या व उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे स्थलांतर केले जाणार आहे. त्यामुळे या कामासाठी एकूण ९० कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. या कामात जनतेच्या पैशांची बचत केल्याचा दावा भाजपाने केला आहे.

असा आहे उड्डाणपूल
भक्ती-शक्ती चौकातील प्रत्येक दिशेला जाणारे वाहन समगतीने फिरते राहून चौक ओलांडण्याचे नियोजन केलेले आहे. तसेच चौकात असणाºया भक्ती-शक्ती शिल्पसमूह शिल्पाचे सौंदर्य कोठेही कमी होणार नाही, याची दक्षता घेतली आहे. नियोजित उड्डाणपुलाचे क्रॅश बॅरिअर हे भक्ती-शक्ती शिल्पाच्या तळाशी समपातळीमध्ये आहे. यामुळे बसमधील प्रवाशांनादेखील पुलावरून संपूर्ण शिल्पाचे दर्शन होणार आहे. भक्ती- शक्ती चौकामध्ये तीन लेव्हलमध्ये बांधकाम केले जाणार आहे. प्राधिकरण ते मोशी दक्षिण- उत्तर वाहतुकीमुळे शहर जोडणार असून, त्याची लांबी ४२० मीटर आणि २४ मीटर रुंदीच्या दोन लेन, ५.५० मीटर उंची असणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात चेंडू
भाजपा भविष्याचा विचार करून मल्टिट्रान्सपोर्ट हबसाठी आग्रही राहणार, एकीकडे दूरदृष्टी तर दुसरीकडे भविष्याचा विचार न करता उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर प्रकल्प रेटण्यासाठी आग्रही आहे, नियोजन शून्यता. पिंपरी-चिंचवडचे नागरिक संभ्रमात. मुख्यमंत्री नक्की कोणाची बाजू मान्य करणार? असा मॅसेज ‘भक्ती-शक्ती चौक येथील वाहतूक समस्या सोडविण्याविषयी सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाची बाजू मान्य करणार असा प्रश्न आहे.

निगडी-बोपोडी बीआरटी रखडली

१निगडी येथील उड्डाणपुलाच्या आराखड्यात मेट्रोचा विचार केलेला नाही. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा हा पिंपरीपर्यंत होणार असून दुसºया टप्प्यात ही मेट्रो निगडीपर्यंत नेण्याचा विचार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पहिल्या टप्प्यातच पिंपरीऐवजी निगडीपर्यंत मेट्रो न्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सध्याच्या उड्डाणपुलाच्या कामांत भविष्यातील मेट्रोचा विचार केलेला नाही़ याबाबत भाजपाचे सरचिटणीस अमोल थोरात यांनी महापालिका प्रशासनास निवेदन देऊन राष्टÑवादीच्या कालखंडातील आराखडा रद्द करावा, अशी मागणी केली होती. मात्र, ती महापालिका प्रशासनाने मान्य केलेली नाही.
२दुसरा टप्पा होण्यास आणखी दहा वर्षे लागणार आहे, असे कारण दिले आहे. नियोजन शून्य कारभाराचा फटका बसून जनतेच्या पैशांची लूट आजवर राष्टÑवादीने केली. त्यांच्यामुळे निगडी-दापोडी बीआरटी रखडली आहे. पुणे विद्यापीठ आणि वाकड येथील उड्डाणपूल पाडण्यात येणार आहेत. वाहतुकीचे दीर्घकालीन नियोजन व्हावे, याबाबत प्रशासनाकडे मागणी केली़ मात्र, त्यांना दाद न दिल्याने थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला खोडा बसण्याची शकयता आहे.

Web Title: Proposed Nigdi Metro: Dedication-power flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.