Pimpri Chinchwad: स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, दोन महिलांची सुटका; रहाटणीमध्ये पोलिसांची कारवाई
By नारायण बडगुजर | Updated: June 17, 2023 17:32 IST2023-06-17T17:30:29+5:302023-06-17T17:32:14+5:30
रहाटणी येथे पोलिसांनी गुरुवारी (दि. १५) ही कारवाई केली...

Pimpri Chinchwad: स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय, दोन महिलांची सुटका; रहाटणीमध्ये पोलिसांची कारवाई
पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातर्फे ही कारवाई करण्यात आली. यात पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली. रहाटणी येथे पोलिसांनी गुरुवारी (दि. १५) ही कारवाई केली.
रोहन विलास समुद्रे (वय ३४, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याच्यासह एक महिलेच्या विरोधात शुक्रवारी (दि. १५) वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलांना जास्त पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रहाटणी येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर कारवाई केली. बनावट ग्राहक पाठवून वेश्याव्यवसायाच पर्दाफाश केला. यात पीडित दोन महिलांची सुटका केली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलिस कर्मचारी सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.