'बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर', पत्नीवर जबरदस्ती; नकार दिल्याने पतीनं केला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 15:05 IST2022-03-31T15:05:08+5:302022-03-31T15:05:24+5:30
पिंपरीत एका महिलेला पतीनेच वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार घडला

'बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय कर', पत्नीवर जबरदस्ती; नकार दिल्याने पतीनं केला...
पिंपरी : एका महिलेला पतीनेच वेश्या व्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा प्रकार घडला. हा प्रकार ८ डिसेंबर २०२० ते १६ जानेवारी २०२२ या कालावधीत संभाजी चौक, पाषाण येथे घडला. संबंधित महिलेने याप्रकरणी बुधवारी ( दि. ३० ) देहू रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सासू, सासरे, मामी, मामा, जाऊ, दीर, पती यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या मधुमेहाच्या उपचारासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी सासू आणि सासऱ्याने फिर्यादीला दमदाटी केली. तसेच शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीच्या पतीला लग्नापूर्वी मधुमेह होता. ही बाब लग्न जमवताना मध्यस्थी असलेल्या मामा, मामीने फिर्यादीपासून लपवून ठेवली. याबाबत फिर्यादीने मामा आणि मामीकडे विचारणा केली असता मामा, मामी आणि जाऊ यांनी फिर्यादीस शिवीगाळ केली. तसेच मामी, दीर आणि एका व्यक्तीने फिर्यादीसमोर कमी कपडे घालून तिच्यासमोर गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. आरोपी पतीने त्याच्या मधुमेहाच्या औषधोपचारासाठी लागणाऱ्या खर्चासाठी फिर्यादीस वेश्या व्यवसाय चालणाऱ्या बुधवार पेठेत नेले. तिथे फिर्यादीला वेश्या व्यवसाय कर अशी पतीने विचारणा केली. फिर्यादीने वेश्या व्यवसाय करण्यास नकार दिल्याने पतीने फिर्यादीसोबत अनैसर्गिक संभोग केला. विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी दिलेले स्त्रीधन परत न देता फिर्यादीस घरातून हाकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.