पिंपरीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; एक जण अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 17:43 IST2021-09-25T17:42:10+5:302021-09-25T17:43:15+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्टेशन समोर स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती.

पिंपरीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी केला पर्दाफाश; एक जण अटक
पिंपरी : स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. पीडित महिलांची सुटका करून याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केल असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. पिंपरी रेल्वे स्टेशन समोर शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी ही कारवाई केली.
राहूल जाधव, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह समीर हरी राठोड (वय २१, रा. काळेवाडी फाटा) व एक महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक शितल गिरी यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
उर्जा मंत्री नितीन राऊत म्हणतात, 'महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही'
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्टेशन समोर स्पा सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोजराज मिसाळ तपास करीत आहेत.