सांगवीत युगांडातील महिलेकडून केला जात होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून केली सुटका

By रोशन मोरे | Published: August 19, 2023 04:41 PM2023-08-19T16:41:28+5:302023-08-19T16:42:10+5:30

पोलिसांनी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोन जणींना अटक केली आहे...

Prostitution was practiced by a Ugandan woman in Sangweet; The police raided and rescued him | सांगवीत युगांडातील महिलेकडून केला जात होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून केली सुटका

सांगवीत युगांडातील महिलेकडून केला जात होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी छापा टाकून केली सुटका

googlenewsNext

पिंपरी : पैशाचे आमिष दाखवून युगांडा देशातील महिलेकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात होता. या महिलेची सुटका अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली. ही कारवाई गुरुवारी (दि.१७) सांगवी येथे करण्यात आली. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागातील पोलिस नाईक संगीता रामनाथ जाधव यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करत दोन जणींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी महिला या पैशाच्या अमिषाने पीडित महिलेकडून सांगवीतील एका सोसायटीमधील प्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय करून घेत होत्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा टाकून पीडित महिलेची सुटका केली. पीडित महिला युगांडा देशातील असून तिच्या व्हिसाची मुदत संपली असल्याचे पोलिसांना दिसून आले.

Web Title: Prostitution was practiced by a Ugandan woman in Sangweet; The police raided and rescued him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.