‘वडे-पकोडे’तळून शासनाचा निषेध, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:59 AM2019-02-08T00:59:53+5:302019-02-08T01:00:48+5:30
दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे भाजपा सरकारचे आंदोलन फोल ठरले. केंद्र शासनाच्या धोरणामुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत.
पिंपरी : दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे भाजपा सरकारचे आंदोलन फोल ठरले. केंद्र शासनाच्या धोरणामुळे उद्योग-व्यवसाय अडचणीत आले आहेत. सुशिक्षित तरुणांनी ‘पकोडे’ तळले, तरी त्यातून रोजगारनिर्मिती होते, असा सल्ला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चुकीची धोरणे राबविणाºया केंद्रातील भाजपा सरकारचा शहर राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध नोंदवला. निगडी प्राधिकरणातील चौकात कार्यकर्त्यांनी चक्क वडे-पकोडे तळले.
निगडीतील लोकमान्य टिळक पुतळा चौकात झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस शरद काळभोर, नीलेश पांढारकर, कुणाल थोपटे, योगेश गवळी, हर्षवर्धन भोईर, शेखर काटे, भागवत जवळकर, सुनील गव्हाणे, श्रीकांत धनगर, आलोक गायकवाड, मनोज वीर, सनी डहाळे, सतीश डोईफोडे, शिवराज रणवरे, चैतन्य चौरडिया, अमनजित दीपसिंग कोहली, साईश कोकाटे, श्रीरंग भोसले, प्रतीक नायगावकर, ऋषभ म्हेत्रे, मंगेश बजबळकर, हर्षद म्हेत्रे, हेमंत
बडदे, आदित्य आडे, हेमल मूर्ती, अण्णा पिल्ले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
रोजगारवाढीला आणि व्यवसायाच्या विकासाला मारक असे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यामुळे मागील चार वर्षांत ४५ टक्के रोजगारात घट झाली. नोटाबंदीमुळे छोटे उद्योग-व्यवसाय देशोधडीला लागले. नवीन रोजगार निर्माण करण्याऐवजी मोदी सरकार सुशिक्षित बेरोजगारांना ‘पकोडे’तळण्याचा सल्ला देत आहे.
नवीन उद्योग, व्यवसायांतील कर्ज, अनुदान, शिष्यवृत्ती, शिक्षण क्षेत्रातील अनुदान कमी करून भांडवलदारांना कोट्यवधीचे कर्ज व अनुदान दिले जात आहे. दर वर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, असे फसवे आश्वासन देणाºया भाजपा सरकारचा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसतर्फे तीव्र निषेध नोंदवत आहे, असे राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी सांगितले. या वेळी युवकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली.