Pimpri Chinchwad: मनोरुग्ण तरुणीवर घरमालकाकडून अत्याचार, काळेवाडी परिसराती धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 11:36 AM2024-01-15T11:36:17+5:302024-01-15T11:36:53+5:30
काळेवाडी परिसरात २१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली....
पिंपरी : भाडेकरू कुटुंबातील १८ वर्षीय मनोरुग्ण तरुणीवर घरमालकाने लैंगिक अत्याचार केला. काळेवाडी परिसरात २१ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीच्या ४८ वर्षीय आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ६५ वर्षीय घरमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरमालकाच्या जागेत फिर्यादी यांचे कुटुंब भाड्याने राहत आहे.
फिर्यादी यांच्या १८ वर्षीय मुलीचा वयानुसार बौद्धिक विकास झाला नसल्याने ती मानसिक दृष्ट्या कमकुवत आहे. याचा गैरफायदा घेत घरमालकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.