Pune Crime | अश्लील फोटो व्हाट्सअपद्वारे पाठवून महिलेची बदनामी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 02:15 PM2022-06-02T14:15:27+5:302022-06-02T14:16:02+5:30
काळेवाडी येथे १४ मेपासून ते १ जून या कालावधीत ही घटना घडली...
पिंपरी : कर्ज मंजूर होण्यासाठी गुगल पे द्वारे पैसे भरायला लावून अनोळखी व्यक्तीने महिलेची आर्थिक फसवणूक केली. तसेच महिलेचे माॅर्फ केलेले अश्लील फोटो मैत्रीण व नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. काळेवाडी येथे १४ मेपासून ते १ जून या कालावधीत ही घटना घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. १) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेला फोन केला. कर्ज मंजुरीसाठी १० हजार ४८९ रुपये गुगल पेद्वारे भरायला सांगत फिर्यादी महिलेची आर्थिक फसवणूक केली.
त्यानंतर फिर्यादी महिलेचे फोटो मॉर्फ केले. ते अश्लील फोटो, आधार कार्ड व पॅन कार्ड फिर्यादीची मैत्रीण व चुलते यांना व्हाट्सअपद्वारे पाठवून बदनामी केली. मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून आरोपीने फिर्यादी महिलेचा विनयभंग केला.