Pune Crime: काेयत्यासह दशहत पसरविणाऱ्या ‘भाई’ला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 20:43 IST2021-12-25T20:40:11+5:302021-12-25T20:43:11+5:30
पोलिसांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले

Pune Crime: काेयत्यासह दशहत पसरविणाऱ्या ‘भाई’ला बेड्या
पिंपरी : कोयत्यासह दहशत पसरविताना ‘भाई’ला अटक करण्यात आली. डेअरी फार्म समोर भूमकर चौक ते डांगे चौक रोड, वाकड येथे शुक्रवारी (दि. २४) पावणेदहाच्या सुमारास वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. कृष्णा तुळशीराम राऊत (वय २२, रा. काळाखडक, वाकड, मूळ रा. वाशी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), असे अटक केलेल्या ‘भाई’चे नाव आहे. पोलीस कर्मचारी अतिक शेख यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राऊत हा लोखंडी कोयता घेऊन डेअरी फार्म समोर भूमकर चौक ते डांगे चौक रोड, वाकड येथे मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरवित असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कोयता जप्त केला. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता शेअरचॅटवरून डाऊनलोड केलेला पिस्तूलचा व्हिडिओ त्याने व्हाटसअप स्टेटसला ठेवला असल्याचे पोलिसांना दिसून आले. आरोपी हा पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहायक निरीक्षक अभिजित जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, पोलीस कर्मचारी बिभिषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, बापूसाहेब धुमाळ, विजय गंभीरे, विक्रम कुदळ, दीपक साबळे, अतिष जाधव, बाबा चव्हाण, अतिक शेख, प्रमोद कदम, कौंतेय खराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.