Pune Heavy Rain: पवना, मुळशी धरणांमधून विसर्ग वाढविला

By विश्वास मोरे | Published: September 16, 2022 12:57 PM2022-09-16T12:57:19+5:302022-09-16T13:02:32+5:30

पिंपरी चिंचवड : संततधार पावसामुळे मावळमधील पवना आणि मुळशीतील मुळशी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात ...

Pune Heavy Rain Increased discharge from Pune, Mulshi dams pune rain updates | Pune Heavy Rain: पवना, मुळशी धरणांमधून विसर्ग वाढविला

Pune Heavy Rain: पवना, मुळशी धरणांमधून विसर्ग वाढविला

googlenewsNext

पिंपरी चिंचवड : संततधार पावसामुळे मावळमधील पवना आणि मुळशीतील मुळशी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. पवना धरणाच्या पाणलाेट क्षेत्रात पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पवना धरणाच्या सांडव्याद्वारे आज सकाळी ८ ला २१०० क्युसेक व पॉवर आऊटलेट १४०० असे एकूण ३५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

नदीतीराकडील गावातील रहिवाशांनी सतर्क रहावे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारे पाणी यांचे प्रमाण बघून धरणातून सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ अथवा कमी करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

मुळशी तालुक्यातील मुळशी धरणातून आज सकाळी १० वाजता धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग १३२०० वरून १५८४० क्युसेक्स करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. त्यामुळे नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरीकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन टाटा पॉवरचे बसवराज मुन्नोळी यांनी सांगितले.

Web Title: Pune Heavy Rain Increased discharge from Pune, Mulshi dams pune rain updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.