पुणे-लोणावळा लोकल : अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांची गैरसोय, तिसऱ्या लेनसाठी अद्याप प्रतीक्षाच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:54 AM2019-03-18T02:54:07+5:302019-03-18T02:54:23+5:30
लोणावळा-पुणे लोकलला नुकतीच ४२ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत सेवमध्ये अनेक सुधारणा झाल्या. पण काही समस्या तशाच आहेत. त्या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.
लोणावळा : लोणावळा-पुणे लोकलला नुकतीच ४२ वर्ष पूर्ण झाली. या कालावधीत सेवमध्ये अनेक सुधारणा झाल्या. पण काही समस्या तशाच आहेत. त्या समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. प्रवासी संख्येच्या मानाने लोकलच्या फेºया अपूर्ण आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मची उंची कमी असल्यामुळे चढ-उतार करताना त्रास होत आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थाही अपूर्ण आहे. ा्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता लोकल गाड्यांकरिता तिसºया लेनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे़ याबाबत ‘लोकमत’ टीमने घेतलेला आढावा.
लोणावळा : मुंबई-पुणे लोहमार्गावरील सर्वांत देखणं, स्वच्छ व सुशोभित रेल्वे स्थानक असलेल्या लोणावळा रेल्वे स्थानकावरून पुण्याला जाणाºया व पुण्याहून लोणावळ्याला येणाºया लोकल गाड्यांच्या फेºया व डब्ब्यांची संख्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवासी करत आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता लोकल गाड्यांकरिता तिसºया लेनचे काम लवकरात
लवकर पूर्ण झाल्यास लोणावळा-पुणे हा प्रवास अधिक जलद व सुरक्षित होणार आहे.
मुंबई-पुणे लोहमार्गावरील सर्वांत सुंदर रेल्वे स्थानक अशी लोणावळा स्थानकाची ओळख झाली आहे. सर्व अद्ययावत सुविधांसह स्थानकावरील स्वच्छता वाखण्याजोगी आहे. नुकतेच या स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, प्लाट फार्म क्र. दोन व तीनची लांबी तसेच शेड वाढविण्यात आल्याने मोठ्यात मोठी गाडी देखील स्थानकाबाहेर जात नाही. याच धर्तीवर फ्लाट फार्म क्र. एकची लांबी व शेड वाढविण्याची मागणी केली जात आहे. भाजी मार्केट येथील स्वयंचलित तिकीट काऊंटरप्रमाणेच मावळा चौकात तिकीट केंद्र झाल्यास नागरिकांना त्यांना फायदा होईल, याकरिता रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. स्थानकावरील कचरा गोळा करण्यासोबत स्थानक दिवसातून दोन ते तीन वेळा पाण्याने धुतले जात असल्याने स्थानकाचा परिसर स्वच्छ व सुंदर बनला आहे.
लोकलकरिता स्वतंत्र ट्रॅक नसल्याने लोकल गाड्या मार्गात थांबवत लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पुढे जाण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
सीसीटीव्ही कँमेºयाची स्टेशनवर नजर
१लोणावळा स्थानकावरून लोकल गाडी सुटत असल्याने सर्व प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळते. तसेच पुण्याहून येताना शेवटचे स्थानक लोणावळा असल्याने प्रवाशांना या भागात लोंबकळत प्रवास करण्याची फारशी गरज भासत नाही. रेल्वे गाडी स्थानकावर आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडत जाऊ नये, याकरिता सीआरपीएफचे जवान तैनात असतात. तसेच तिकीट घरांकडील बाजूला लोखंडी रेलिंग लावण्यात आल्याने प्रवासी आता रेल्वे रूळ ओलांडत जाऊ शकत नाही. स्थानकावर दोन पादचारी पूल आहेत त्यांची देखील रूंदी वाढविण्यात आली आहे. तसेच हायवेकडील बाजूला स्वयंचलित जिना बसविण्यात आला असून, लवकरच बाजार भागात देखील स्वयंचलित जिना लावण्यात येणार आहे. स्थानकावर पिण्याचे पाणी, बसण्याकरिता बाकडे तसेच सुरक्षेकरिता सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे.
महिला स्वच्छतागृहाची आवश्यकता
२ स्थानकांची प्रवेशद्वारे व तिकीट घराचा परिसर अद्ययावत करण्यात आल्याने या भागात नागरिकांना प्रसन्न वाटते. बाजारभागात रेल्वेने सुमारे सहाशे ते सातशे दुचाकी व दोनशे चारचाकी वाहने मावतील ऐवढी पार्किंग केली असून, रिक्षाकरिता स्वतंत्र थांबा बनविला आहे. या पार्किंग भागात महिलांकरिता स्वच्छतागृह व चेजिंग रूम बनविण्याची मागणी याभागातील नागरिकांनी केली आहे. लोणावळा हे पर्यटनस्थळ असून, पावसाळ्यात याभागात विविध राज्यांतून पर्यटक येत असताना पावसात भिजण्याचा आनंद घेतल्यानंतर त्यांना चेजिंगरूमची सुविधा उपलब्ध झाल्यास फायदा होईल. तसेच महिलांकरिता स्वच्छतागृह झाल्यास पर्यटक महिलांची गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.
अपुऱ्या पादचारी पुलाचा त्रास
तळेगाव दाभाडे : येथे केंद्रीय संरक्षण विभागाचा डेपो असल्याने मालवाहतूक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी तळेगाव रेल्वे स्थानक महत्त्वाचे आहे. गेल्या काही वर्षांत तळेगाव शहर परिसरात वाढलेल्या नागरीकरणामुळे येथील रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली
आहे. त्यामुळे प्रत्येक लोककला प्रचंड गर्दी असते. परंतु एकच पादचारी पूल असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. त्यामुळे यशवंतनगरकडे जाणाºया व येणाºया प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.
बाहेर जाण्यासाठी असलेल्या गेटवरच वाहने लावलेली असतात. रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या हद्दीचा फटका प्रवाशांना बसत आहे. दुसºया पादचारी पुलाचे काम चालू आहे. मात्र कामात अधिक गती हवी आहे. प्रवासी चढ-उतार करताना पाकीटमारी होते. फलाटावर पोलिसांची कायम गस्त हवी. उत्पन्नाच्या दृष्टीने हे रेल्वे स्थानक आघाडीवर आहे. सिंहगड आणि भुसावळ एक्स्प्रेसला येथे जाता-येता थांबा द्यावा, आशी मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाची खूप वर्षांपासूनची मागणी आहे.
‘फ्लॅग स्टेशन’ हाच शाप
तळेगाव दाभाडे : घोरावाडी रेल्वे स्थानकास ‘फ्लॅग स्टेशन’ म्हणून असलेला दर्जा हा त्यासाठी शाप ठरला आहे. या दर्जामुळे येथे सिग्नलची सोय नाही.
पारतंत्र्याच्या काळात १९४२ मध्ये स्थानकाची उभारणी करण्यात आली. यामुळे तळेगाव दाभाडे येथील आॅर्डनन्स डेपोच्या (डिओडी डेपो) कामगारांची सोय झाली. लोणावळ्याहून पुण्याकडे जाताना विरुद्ध दिशेला असलेला प्लॅट फॉर्म ही या स्थानकाची ओळख़ हा प्लॅट फॉर्म आजतागायत हजारो प्रवाशांचा कर्दनकाळ ठरला आहे. विरुद्ध दिशेला असलेल्या प्लॅट फॉर्मबाबत परप्रांतीय प्रवासी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे आजतागायत हजारो प्रवाशांना आपले पाय गमवावे लागले आहेत. अनेक प्रवाशांना आपल्या जीवास मुकावे लागले आहे. सध्या या स्थानकावरील उद्घोषणा कक्ष बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. येथे प्रवाशांसाठी पादचारी पूल आहे. मात्र, त्याची सदोष रचना आणि जास्त उंचीवर आहे. त्यामुळे असून अडचण नसून, खोळंबा अशी त्याची परिस्थिती आहे. या पादचारी मार्गाचा वापर करताना लहान मुले आणि वृद्धांची दमछाक होते. अनेक प्रवासी शॉर्टकटने रेल्वे रूळ ओलांडून जीव धोक्यात घालताना दिसतात. प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करतात. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत़ सद्या हा पादचारी मार्ग म्हणजे दारूड्यांचा अड्डा बनला आहे. मोकाट कुत्र्यांची आणि चोरट्यांची आश्रयस्थाने बनली आहेत. मावळ तालुका रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष पोपटराव भेगडे आणि पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे येथील अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. घोरावाडी रेल्वे स्थानकावर दोन लोहमार्ग वेगवेगळ्या पातळ्यांवर आहेत. पुण्याहून मुंबईकडे जाणारा मार्ग थोडा उंचावरून जातो.
मुंबईहून पुण्याकडे जाणारा मार्ग कमी उंचीवर आहे. त्यातच घोरावाडी स्थानकावर लोहमार्गास वळण देखील जास्त आहे.गाडी आल्याचे प्रवाशांना लवकर समजत नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी भुयारी मार्ग असणे गरजेचे आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे.
देहूरोड : आरक्षण सुविधा नसल्याने प्रवाशांची होतेय गैरसोय
देहूरोड : देहूरोड रेल्वे स्थानकातील फलाटावर अपुरे निवारा शेड, अपुरी बैठक व्यवस्था, देहूच्या बाजूला अपुरी पार्किं ग व्यवस्था असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानकावर स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा अभाव तसेच आरक्षण सुविधा नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
देहूरोड बाजारपेठेच्या बाजूने स्थानकाच्या तिकीट घराकडे जाताना प्रवेशद्वाराजवळ दुचाकी गाड्या लावल्या जातात. स्थानकात व तिकीट घराकडे जाताना त्रास होत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली. स्थानकावरील महिला व पुरुषांसाठी असणारी स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी येत होती. गुटख्याच्या पुड्या दिसून आल्या. पाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधी सुटली होती. स्वच्छतागृहाच्या परिसरात दुर्गंधीने फलाटावर प्रवासी बसत नसल्याचे दिसून आले. दुर्गंधी येत असतानाही नाईलाजास्तव प्रवाशांना स्वच्छतागृहाचा वापर करावा लागत असल्याचे अनेक प्रवाशांनी सांगितले.
नाही प्यायला पाणी आणि बसायला सावली
वडगाव मावळ : आंदर मावळातील पन्नास गावांचे मुख्य केंद्र तसेच जगाच्या नकाशावर औद्योगिक क्षेत्रात झळकलेले कान्हे गावचे रेल्वे स्थानक सुरू होऊन वीस वर्ष झाली. परंतु प्रवाशांसाठी ना प्यायला पाणी ना बसायला सावली. मासिक पास व परतीचे तिकीट मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामान करावा लागत आहे. या स्थानकाचे भूमिपूजन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर २२ नोव्हेंबर १९९८ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री राम नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परंतु एकवीस वर्षांत दुर्लक्ष झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसू लागला आहे. कान्हे हे आंदर मावळाचे मुख्य केंद्र असून या भागात कान्हे-टाकवे एमआयडीसी असून छोट्या मोठ्या २० ते २५ नामांकित कंपन्या आहेत. या स्थानकाला अधिक महत्त्व आले आहे. या स्थानकावरून शालेय विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यावसायिक, व्यापारी पुणे, लोणावळा व इतर ठिकाणी जाण्यासाठी येतात.
४येथे संगणक नसल्याने प्रवाशांना तिकिटावर शिक्का मारून तिकिटे दिले जातात.ती तिकीट द्यायची मशिनही जुनीच आहे. ठेकेदाराला तिकीट विक्रीच्या रकमेवर कमिशन दिले जाते. जास्त विक्री होऊनही कमिशन तेवढे मिळत नसल्याने ठेकेदारही वैतागला आहे. मासिक पास, परतीचे तिकीट या स्थानकावर मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना, कामगार, व्यापारी यांना पास काढण्यासाठी कामशेत किंवा वडगावला जावे लागते. या स्थानकाला हॉल्ट स्टेशनचा दर्जा आहे.
४या बाबत रेल्वे प्रवासी संघटनेचे सल्लागार हेमंत टपाले म्हणाले, ‘‘ या स्थानकावर ठेकेदाराकडून तिकीट विक्री होते. ती बंद करून रेल्वे प्रशासनाने करावी दोन्ही प्लॅट फॉर्मवर आजून दोन शेड करावीत, लोणावळा पुणे प्लॅट फॉर्मवर तुटलेले प्लॅट फॉर्म दुरुस्ती करून प्रवाशांसाठी पायºया कराव्यात़ पिण्याच्या पाण्याची सोय करावी़ तसेच महत्त्वाचे मासिक पास व परतीचे तिकीट मिळण्याची सोय करावी़ तसेच आंदर मावळातील लोकांसाठी रेल्वे गेटपासून ते स्थानकापर्यंत येण्याजाण्यासाठी रस्ता करावा, अशा विविध मागण्या केल्या आहेत.’’
अपु-या बैठक व्यवस्थेमुळे प्रवासी झाले हैराण
कवळे : शेलारवाडी, कुंडमळा, इंदोरी, माळवाडी, कान्हेवाडीसह पवन मावळ भागातील सोमाटणे, शिरगाव , धामणे, गोडुंब्रे भागातील कामगार, विद्यार्थी, शेतकरी व दुग्धव्यावसायिक बेगडेवाडी रेल्वे स्थानकाचा वापर करीत असतात . तसेच घोरवडेश्वर डोंगरावर येणारे भाविक दर्शनासाठी या स्थानकावरून ये-जा करीत असतात. मात्र रेल्वे प्रशासनाच्या नाकर्तेपणाने येथील प्रवासी पुरते हैराण झाले आहेत. फलाटावर अपुरे निवारा शेड,अपुरी बैठक व्यवस्था, घोरवडेश्वर डोंगराच्या बाजूला तिकीटघर, वाहनतळ व्यवस्था व स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा अभाव, स्थानकावरील अपुरी बैठक व्यवस्था अपुरी असून ये-जा करणारे प्रवासी हैराण झाले आहेत.
बेगडेवाडी स्थानकावर महामार्गाच्या बाजूने तिकीटघर नसल्याने लोणावळा, तळेगावकडे जाणाºया प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी विरुद्ध बाजूला जावे लागत आहे. लोखंडी पत्र्यांच्या माध्यमातून प्रतीक्षालयात बांधले असल्याने त्याठिकाणी पंखे बसविणे गरजेचे आहे. फलाटालगत तारेचे कुंपण नसल्याने कोठूनही प्रवेश करणे शक्य आहे. स्थानक परिसरात अस्वच्छता दिसून येत आहे. स्वच्च्छतागृहात दुर्गंधीने प्रवासी त्रस्त झाले आहेत. स्वच्छतागृहांची संख्या अपुरी असताना एका स्वच्छतागृहाला कुलूप लावलेले आढळून आले. सुविधांअभावी धोकादायकपणे लोहमार्ग ओलांडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. तिकीट घराकडे अपंगांना जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अपंगांचे हाल होत आहेत. दोन्ही फलाटांवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. मात्र पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे . नळालगत ओट्यावर तंबाखू व गुटखा खाऊन थुंकल्याने पाणी पिण्याची इच्छा होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. फलाटावरील लोखंडी जाळ्या तुटल्या आहेत.