पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 06:41 PM2021-09-02T18:41:54+5:302021-09-02T18:42:05+5:30

बीट मार्शलने जागेवरच लुटमार करणाऱ्या एकाला पकडले तर दुसरा फरार

Pune - Mumbai highway truck driver robbed 17 thousand; He also smashed the glass of the car while putting the bike horizontally | पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली

पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली

Next
ठळक मुद्देआरोपीने हातातला कोयता हवेत भिरकावून जोरजोरात ओरडून रस्त्यावर दहशत केली निर्माण

पिंपरी : पुणे - मुंबई हायवेवर ट्रकसमोर दुचाकी आडवी घालून दगडाने काच फोडत १७ हजार लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका आरोपीला वाकड पोलिसांच्या बीट मार्शलने पकडले. तर दुसरा आरोपी पळून गेला आहे. काळाखडक, वाकड येथे बुधवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली.

खंडू जालिंदर लोंढे (वय २४ रा. शिवराज नगर, रहाटणी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह त्याच्या साथीदारावर (नाव पत्ता माहीत नाही) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सादिक अब्दुल सत्तार सय्यद (वय २८, रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. १) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद हे काळाखडक, वाकड येथून त्यांचा ट्रक घेऊन पुणे - मुंबई हायवेने जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या खंडू लोंढे आणि त्याच्या साथीदाराने ट्रकला दुचाकी आडवी घातली. त्यानंतर दगडाने ट्रकची काच फोडली. ट्रकचालकासोबत असलेल्या कामगारांना मारहाण करून खल्लास करण्याची धमकी दिली. तसेच कोयत्याचा धाक दाखवत खिशातील मोबाईल, रोख रक्कम आणि टेप, असा एकूण १७ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. गाडी पुढे आणली तर खल्लास करून टाकेल, अशी धमकी देऊन आरोपीने जाताना हातातला कोयता हवेत भिरकावून जोरजोरात ओरडून रस्त्यावर दहशत निर्माण केली. या दहशतीला घाबरून रस्त्यावरील जाणाऱ्या लोकांनी आपल्या गाड्या घाबरून मागे वळून निघून गेले. 

एकाला पकडण्यात यश तर दुसरा फरार 

दरम्यान, गस्तीवर असलेल्या वाकड पोलिसांच्या बीट मार्शलच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी खंडू लोंढे याला पकडले. मात्र त्याचा साथीदार पळून गेला. रात्रगस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी खंडू लोंढे याला ताब्यात घेतले. फिर्यादी यांनी तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोंढे याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार तपास करीत आहेत.

Web Title: Pune - Mumbai highway truck driver robbed 17 thousand; He also smashed the glass of the car while putting the bike horizontally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.